भद्रावती –
शिक्षण विभाग व पंचायत समिती भद्रावती अंतर्गत. दि.८ डिसेंबर ते १० डिसेंबर२०२५ पर्यंत भद्रावती तालुक्यातील घमाबाई माध्यमिक निवासी आश्रम शाळा, तांडा येथे नुकतेच तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी चे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनीमध्ये सेंट अँनस हायस्कूल सुमठाणा, भद्रावती या शाळेचा गैर आदिवासी माध्यमिक विभागातून तालुका प्रथम क्रमांक आला.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये सुरज राहुलगडे व साईतेज मिसा या विद्यार्थ्यांनी पाणी वाचवा या विषयावर प्रयोग सादर केला. याकरिता त्यांनी विज्ञान शिक्षिका व मुख्याध्यापिका यांचे मार्गदर्शन मिळाले.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे परीक्षण प्रा भिष्माचार्य बोरकुटे, प्रा राकेश आवारी, प्रा. प्रविण मत्ते, प्रा. डॉ आशिष आकोजवार, प्रा. पवन गौरकर, प्रा. अर्पिता मुंजे यांनी केले. या बक्षीस वितरण सोहळ्याला उपस्थित धनाजी नाईक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तुकाराम पवार, डॉ. प्रकाश महाकाळकर, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, भद्रावती, आशुतोष सपकाळ गटविकास अधिकारी पंचायत समिती भद्रावती, इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये विजयी विद्यार्थी यांचा प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. विजय विद्यार्थी व शिक्षकांचे केंद्र प्रमुख खासरे सर, सेंन्ट ऍनस हायस्कूल सुमठाणा च्या मुख्याध्यापिका मर्सी थॉमस व सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.






