अकोला
तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातुर जिल्हा अकोला येथील प्रा. निलेश पाकदुणे यांनी संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावतीची आचार्य पदवी प्राप्त केली आहे.
प्रा. निलेश पाकदुणे यांच्या संशोधनाचा विषय “आदिवासी बारेला जमातीच्या लोकसाहित्याचा अभ्यास’ हा होता . त्यांनी हे संशोधन कार्य डॉ. श्रीकृष्ण काकडे मराठी विभाग प्रमुख शंकरलाल खंडेलवाल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, अकोला यांच्या मार्गदर्शनात पुर्ण केले. संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती च्या वतीने त्यांना नुकतीच पीएचडी ही पदवी प्रदान करण्यात आली.
त्यांना गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावतीची पीएचडी पदवी देऊन सन्मानित केल्याबद्दल बेरार एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापक तथा माजी प्राचार्य विजयसिंहजी गहीलोत सर, सचिव स्नेह प्रभादेवी गहीलोत मॅडम, प्राचार्य अंशुमानसिंहजी गहिलोत सर, उपप्राचार्य सुनील चव्हाण सर, उपमुख्याध्यापिका रश्मी ढेंगे मॅडम, पर्यवेक्षिका प्रिती कारस्कर मॅडम, पर्यवेक्षक संजय मुखाडे सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. परिसरातील मित्रमंडळींनी त्यांचे कौतुक केले व अभिनंदन यांचा वर्षाव केला.






