spot_img
spot_img
22.3 C
New York
Thursday, July 30, 2026

महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान सर्वांना प्रेरणादायी… डॉ नितीन वाघमोडे आयुक्त

महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न पुरस्कार सोहळा थाटात संपन्न…

पुणे

ए. डी फाउंडेशन च्या वतीने पुणे आयोजित राज्यस्तरीय महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात अध्यक्षीय मार्गदर्शन करताना आयकर आयुक्त डॉ वाघमोडे यांनी “महिला अधिक संवेदनशील असून, कार्यक्षम असतात. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान हा समाजाला प्रेरणादायी ठरेल” असे प्रतिपादन केले.

ए डी फाउंडेशन च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न पुरस्कार 2025 या सोहळ्याचे आयोजन सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह गंज पेठ या ठिकाणी मोठ्या थाटात संपन्न झाला. या प्रसंगी व्यासपीठावर सन्मान सोहळ्याचे अध्यक्ष डॉ नितीन वाघमोडे आयकर आयुक्त, पुणे तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ अंजना खताळ विधीज्ञ, मुंबई प्रा शिवाजी खांडेकर सरचिटणीस शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य, एडवोकेट कु. प्रियदर्शन कोकरे सुप्रसिद्ध व्याख्याती, डॉ सारिका महेश शहा मिस इंडिया 2018, मिस वर्ल्ड 2021, विठ्ठल धायगुडे नगर रचनाकार मुंबई, दिलीप वाघमोडे जि. प. सदस्य, अशोक श्रीपती गोरड संस्थापक अध्यक्ष ए डी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य प्रा. महादेव माहानूर, कार्याध्यक्ष ए डी फाउंडेशन आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व आपल्या कर्तुत्वाचा ठसा समाजात उमटलेल्या कर्तृत्ववान महिलांचा महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न पुरस्कार प्रदान करुन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील 125 महिलांना प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देउन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ऍडव्होकेट डॉ अंजना खताळ, कु. प्रियदर्शनी कोकरे, डॉ सारीका शहा, प्रा. शिवाजी खांडेकर आदींनी यथोचित, महिलांना प्रेरणादायी असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी सौ केशनी ज्ञानेश हटवार, भद्रावती, अश्विनी लाटकर , शिक्षणाधिकारी, संभाजी नगर, रेवतकर मॅडम सिंदेवाही अशा काही महिलांनी प्रातिनिधीक स्वरुपात आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक गोरड यांनी केले. प्रा. महादेव महानूर यांनी कार्यक्रमाचे महत्व पटवून दिले. या सोहळ्याचे सूत्रसंचालन मनाली कोकरे यांनी केले. कार्यक्रमाला महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त महिला व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने या देखण्या सोहळ्यात उपस्थित होते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!