spot_img
spot_img
22.6 C
New York
Saturday, August 1, 2026

अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमावर डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय महाविद्यालयात कार्यशाळा यशस्वी.

भद्रावती

चमत्कारामागील विज्ञान व वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय महाविद्यालय, भद्रावती येथे एक दिवसीय अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे, प्रमुख अतिथी डॉक्टर कार्तिक शिंदे सचिव मद्रासी शिक्षण संस्था भद्रावती,प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. पुंडलिक जाधव, प्राचार्य डॉक्टर सुधीर होते विचारपिठावर उपस्थिती होते.

भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासण्याचे कर्तव्य दिले. विवेक, चिकित्सक विचार आणि पुराव्यावर आधारलेला तर्क नसेल, तर समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता ही घटनात्मक आश्वासने केवळ कोरडीच ठरतील. वैज्ञानिक दृष्टीकोन हा केवळ वैचारिक आदर्श नाही, तर लोकशाहीचे प्राणतत्त्व असल्याची माहिती कार्यक्रमांचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे यांनी विद्यार्थांशी संवाद साधताना दिली.

अंधश्रद्धेविरुद्धचा लढा फक्त भोंदूगिरी नष्ट करण्यासाठी नसून तो मानवी प्रतिष्ठा, समानता आणि विवेकाधिष्ठित समाजरचनेचा लढा आहे. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन अजूनही रुजला नाही, अंधश्रद्धा समाजातील सर्व स्तरांवर दिसते अशी माहिती संस्थेचे सचिव डॉ. कार्तिक शिंदे यांनी दिली. प्रा. पुंडलिक जाधव यांनी व्याख्यानातून सविस्तर मार्गदर्शन करत असताना भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगाला आश्चर्यचकित करणारी प्रगती केली आहे. चुकीची माहिती, चमत्कारिक उपचार, कटकारस्थानांच्या अफवा, अंधश्रद्धाळू मेसेज सोशल मीडियामुळे सहज पसरतात.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सुधीर मोते, यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा लांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन कपिल राऊत यांनी केले. यावेळी प्रशासकीय महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद पाठक, डॉ. प्रशांत पाठक, प्रा . विशाल प्रसाद, प्रा. प्रीती कन्दकट्टीवार, प्रा. नेहा मानकर, यांचे सहकार्य लाभले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!