spot_img
spot_img
25.1 C
New York
Saturday, June 6, 2026

चालत्या गाडीने घेतला पेट..

आनंदवन चौकातील घटना..

अनर्थ घडू नये यासाठी वरोरा पोलिसांची मोलाची कामगिरी..

आवश्यक कामानिमित्त तीन लोक काही आवश्यक कामानिमित्त नागपूरवरून MH 31 – F U 6673 होंडाई अल्काझर या गाडीने चंद्रपूर ला गेले होते. परतीच्या प्रवासात गाडीत शॉर्ट सर्किट झाला, धुव्वा निघायला लागल्याचे चालकाचे लक्षात आले. प्रसनगावधान राखत गाडी आनंदवन चौकात तात्काळ थांबविण्यात आली. गाडीमध्ये असलेले तिघेही समयसूचकता ठेऊन गाडीचे दरवाजा उघडून बाहेर निघाले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असून कोणतीही जीवित हानी झाली नाही. सदर घटना आज दि. 19 सप्टेंबर 2025 ला
दुपारी 2:45 च्या दरम्यान घडली.
वाहन मालक अमीन हजियानी, कासिम मलिक , व चालक जुवेद अहमद हे तिघेही नागपूर वरून काही आवश्यक कामानिमित्त चंद्रपूर ला गेले होते. काम आटोपल्या नंतर ते नागपूर ला जाण्यासाठी निघाले असता गाडीमध्ये शॉर्ट सर्किट झाले आणि धुव्वा निघायला लागला हे चालक जुवेद अहमद यांचे लक्षात आले. आणि समयसूचकता ठेऊन आनंदवन चौकात त्वरित गाडी उभी ठेऊन तिघेही गाडीचे खाली उतरले. पाहता – पाहता गाडी पूर्णतः जळून खाक झाली. काही अनर्थ घडू नये यासाठी पोलीस विभागाने पूर्णतः दक्षता घेतली. आणि न.प. व वर्धा पॉवर च्या अग्निशमन दलाला पाचारण करून पूर्णतः आग आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने या मध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी गाडी मात्र पूर्णतः जळून खाक झाली आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!