spot_img
spot_img
24.4 C
New York
Saturday, June 6, 2026

कवी कुलगुरू कालिदास विश्वविद्यालय वर्धापन दिन उत्साहात साजरा

भद्रावती

भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित डॉ . विवेक शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालय भद्रावतीमध्ये कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यापीठ वर्धापन दिन आनंदात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विश्वविद्यापीठाचा ध्वजारोहण करण्यात आला व राष्ट्रगीत सादर करण्यात आले. सदर कार्यक्रमाची संकल्पना संस्थेचे सचिव डॉ. कार्तिक शिंदे यांच्या मार्गदर्शनात पार पडली. कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने करण्यात आली असून कवी कालिदास यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाठक, प्रमूख पाहुणे म्हणून प्रा. प्रज्ञा बुरडकर, प्रा. प्रीती कंदीकट्टीवार व्यासपीठावर उपस्थित होते. प्रा. प्रज्ञा बुरडकर यांनी प्रास्ताविकेतुन कवी कालिदास यांच्या आत्मचरित्रावर प्रकाश टाकला. प्रा. प्रीती कनकट्टीवार यांनी कालिदासाचे जीवनकार्यावर विद्यार्थांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणातून डॉ. प्रशांत पाठक यांनी कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यापिठाचे महत्व विद्यार्थांच्या लक्षात आणुन दिले व कवी कालिदास यांच्या जीवनकार्यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.ए. प्रथम वर्षाची विद्यार्थिनी दामिनी परचाके हिने केले व आभार प्रा. नेहा मानकर यांनी मानले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद पाठक, प्रा. कपिल राऊत, प्रा. विशाल प्रसाद, शिक्षकेत्तर कर्मचारी व असंख्य विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!