spot_img
spot_img
22.3 C
New York
Thursday, July 30, 2026

भंडारा जिल्हास्तरीय स्वयंशासन स्पर्धा संपन्न…!

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

जिल्हा प्रतिनिधी :- दि. 16 सप्टेंबर..

  *मराठी विषय शिक्षक असोसिएशन भंडारा द्वारा आयोजित झेंडा टू झेंडा उपक्रमांतर्गत  "शिष्य बनले गुरुवर्य " जिल्हास्तरीय स्वयंशासन स्पर्धा दिनांक १४ सप्टेंबरला ऑनलाईन पार पडली. या स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण ५१  विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल घोषित झाला असून यात जिल्ह्यातून प्रथम क्रमांक ओम श्रावण फुंडे, गांधी कनिष्ठ महाविद्यालय कोंढा, ता- पवनी याने पटकाविला. द्वितीय क्रमांक मोहिनी मनोज लांजेवार, शशिकांत दैठणकर कमवी बारव्हा,ता- लाखांदूर हिने तर तृतीय क्रमांकाचे मानकरी अदीबानाज अल्ताफ हुसैन शेख, कै. शंकरराव काळे कमवी कार्धा ता- भंडारा व गायत्री जागेश्वर भेंडारकर, मार्तंडराव पाटील कापगते कमवी जांभळी (स) ता - साकोली या ठरल्या. उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक श्रुती ज्ञानेश्वर ठाकरे, द्वितीय श्रुती संजय गजघाटे, तर तृतीय क्रमांक कशिष भोजराजसिंह गौतम व नलिनी मोहन मते यांनी मिळविला.*
*स्वयंशासन स्पर्धा कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा. जितेंद्र टिचकुले यांनी भुषविले तर कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. विजय हेलवटे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. ज्ञानेश हटवार, प्रा. संजय पाटील, प्रा. दिलीप जाधव, प्रा. संजय लेनगुरे, प्रा. विजया मने, प्रा. यशवंत पवार, डॉ. दिशा गेडाम, प्रा.पवन कटरे, प्रा. जगदीश खेडकर, प्रा. संजय गोळे, प्रा. नामदेव मोरे, प्रा. शारदा जुगल धोटे, प्रा. चंद्रकांत भोजने, डॉ. शालिनी तेलरांधे, यांनी उपस्थिती दर्शविली.*

या स्पर्धेचे परीक्षण प्रा. मंजिरी गजरे, ठाणे, प्रा. रंजना देशमुख, प्रा. विजयश्री सावजी, प्रा. वसुधा रामटेके, प्रा. मानसी मंगेश चव्हाण, प्रा.ज्योती शेंडे, प्रा. वैशाली पवार यांनी कामगिरी बजावली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.प्रियंका बोपचे यांनी तर, आभार प्रा. वैशाली मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील बहुसंख्य मराठी विषय शिक्षक उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठी विषय शिक्षक असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!