भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चा उपक्रम ….
भद्रावती
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, चिचोर्डी , भद्रावती येथील विविध क्रीडा प्रकारातील खेळाडूंना संस्थेच्या वतीने किटचे वाटप करण्यात आले.
यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती येथील क्रीडा क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या सर्वच संघांना संस्थेचे सचिव डॉ कार्तिक शिंदे यांच्या हस्ते क्रीडा किट्स चे वितरण करण्यात आले. यात कबड्डी संघ, खो-खो संघ, हॉलीबॉल संघ, ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये भाग घेणारे खेळाडू तसेच विविध क्रीडा प्रकारात यश संपादन करणाऱ्या खेळाडूंना भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीच्या वतीने क्रीडा किटचे वितरण करण्यात आले.
यावेळी संस्थेचे विश्वस्त, माजी प्राचार्य डॉ जयंत वानखेडे, प्राचार्य डॉ सुधीर मोते , क्रीडा शिक्षक प्रा. रमेश चव्हाण हे व्यासपीठावर उपस्थित होते. संस्थेचे सचिव प्रा. डॉ. कार्तिक शिंदे सर यांनी मार्गदर्शन करताना आपल्या महाविद्यालयातील खेळाडूंनी आपल्या खेळाचे नैपुण्य दाखवून विविध क्रीडा प्रकारात यश संपादन करावे व महाविद्यालयाचे नाव लौकिक करावे असे मार्गदर्शन केले. शालेय क्रीडा स्पर्धेत तालुका , जिल्हा, विभाग स्तरावर विजयी झालेल्या टीमचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, प्राध्यापक , विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.






