spot_img
spot_img
29.9 C
New York
Friday, July 31, 2026

भद्रावती येथे स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टव्दारा शिक्षक दिन सोहळा संपन्न

जिल्ह्यातील मान्यवरांची उपस्थिती व शिक्षकांचा सत्कार

भद्रावती :
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन सोहळा श्री मंगल कार्यालय भद्रावती येथे आज रोज शुक्रवारला संपन्न झाला. स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट द्वारा आयोजित या शिक्षक दिनाच्या सोहळ्यात प्रमुख उपस्थिती राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, शिक्षक आमदार सुधाकरजी अडबाले होते, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार करण देवतळे होते. प्रमुख पाहुणे विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे, लोक शिक्षण संस्था वरोराचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे, गुरूकुंज मोझरी सर्वाधिकारी लक्ष्मण गमे, भद्रावती कृउबास सभापती राजू डोंगे आदी उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत भगवी टोपी परिधान करुन पुष्पगुच्छ, ग्रामगीता व ट्रस्टचे मानचिन्ह देवून करण्यात आले.

शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांचा समाजघडणीत मोठा हातभार आहे. शिक्षकांचे स्थान समाजात विशेष आहे. शिक्षक दिनाच्या निमित्ताने त्यांचा आदर सत्कार करणे, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे, यासाठी अशा सोहळ्याचे आयोजन होणे महत्वाचे आहे, असा मान्यवरांनी त्यांच्या वक्तृत्वातून सूर काढला.

लोक शिक्षण संस्था वरोराचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करून वाढदिवस साजरा करण्यात आला. जेष्ठ शिक्षक संघातर्फे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. चंद्रपूरचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

ट्रस्टचे उपक्रम श्रध्देय बाबा आमटे आरोग्य अभियान अंतर्गत तालुक्यातील पानवडाळा येथील रमेश झिलपे दुर्धर आजाराने पिढीत असल्याने यांना उपचाराकरीता आर्थीक सहकार्य करण्यात आले. सोहळ्यात उपस्थीत शिक्षकवर्ग व पाहुण्यांचा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता तथा भगवी टोपी देवून सत्कार करण्यात आले. संचालन प्रा. डॉ. सुधीर मोते तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. ज्ञानेश हटवार यांनी केले.

कार्यक्रमाची सांगता स्नेह भोजनाने झाली. तालुक्यातील शिक्षक व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!