नाशिक :
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन केले. शिक्षक दिनानिमित्त ‘दर्पण राष्ट्रीय शिक्षक गौरव’ पुरस्कार २०२५ रविवार, दिनांक ७ सप्टेंबर, २०२५ रोजी नाशिक येथे रोटरी क्लब सभागृहात संपन्न झाले. या सोहळ्यात प्रा संपतराव गर्जे कार्याध्यक्ष मराठी विषय शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, साहित्यिक क्षेत्रातील अतुलनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
पाथर्डी येथील सेवानिवृत्त प्रा श्री संपत गर्जे हे अविरत सामाजिक, धार्मिक, साहित्यिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना ‘दर्पण राष्ट्रीय शिक्षक गौरव पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. नाशिक येथे रोटरी क्लबच्या सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्यात हा पुरस्कार निसर्ग, पर्यावरण संरक्षक पद्मश्री मा. चैत्रामजी पवार व प्राचार्या लीना भट यांच्या हस्ते प्रा. संपत गर्जे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे होते.
याप्रसंगी सेवानिवृत्त प्रमुख जिल्हा न्यायाधीश दीपकजी ढोलकीया, अजीत चव्हाण, अनिल नहार, आचार्य दीपक दीक्षित, दिनेश भोईर, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
“दर्पण राष्ट्रीय शिक्षक गौरव पुरस्काराने” सन्मानित झाल्याबद्दल प्रा. संपत गर्जे यांचे मराठी विषय शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अभिनंदन केले. तसेच सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या स्नेही मंडळींनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.






