भद्रावती ( ता. प्र )
स्थानिक श्री साई कॉन्व्हेंट स्टेट तथा श्री साई कॉन्व्हेंट सि. बी. एस. ई. यांच्या संयुक्त विद्यमाने ये थील श्री साई कॉन्व्हेंट मध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णण यांच्या जंयती निमित्य शिक्षक दिन व महिला मेळावा तथा विविध कार्यक्रमाचे आयोजन करून शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून श्री साई शिक्षण प्रसारक मंडळा व्दारा संचालित श्री साई कॉन्व्हेंट स्टेट तसेच श्री साई कॉन्व्हेंट सीबीएससी द्वारा महिला मेळावा आणि सॅनिटरी पॅड नॅपकिन मशीन चे हस्तांतरण संस्थेतर्फे शाळेला करण्यात आले. त्याचा उद्घाटन सोहळा कार्यक्रम आज दिनांक ५ सप्टेंबर २०२५ ला शाळेमध्ये साजरा करण्यात आला. त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री साई शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती कांताताई भालचंद्र गुंडावार तसेच प्रमुख उद्घाटक आणि मार्गदर्शक म्हणून डॉक्टर सौ मयुरा अवताडे मॅडम (एम.बी.बी.एस ) तसेच प्रमुख पाहुण्या म्हणून कुमारी. छाया खणके मॅडम विशेष गट साधन व्यक्ती , पंचायत समिती भद्रावती, श्री साई शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव सौ. रुपया अतुल गुंडावार, शाळेच्या मुख्याध्यापिका कुमारी किरण अशोक कोथळे आदी मान्यवर मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते. या सोहळ्याप्रसंगी संस्थेमार्फत शाळेला सॅनिटरी नॅपकिन मशीन आणि वेंडिग डिस्पोजल मशीन भेट देवून त्याचे उद्घाटन करण्यात आले.
त्याप्रसंगी डॉक्टर मयुरा अवताडे मॅडमनी किशोरवयीन मुलींना “मासिक पाळी, आरोग्य आणि स्वच्छता” यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान होणाऱ्या अडचणीचा सामना कसा केला पाहिजे त्याच्यासाठी आरोग्य आणि स्वच्छता कशी साधली पाहिजे , मासिक पाळी दरम्यान छोट्या मुलींच्या आरोग्यावर आणि मनावर होणाऱ्या चिडचिडेपणावर कशी मात केली पाहिजे, योग्य आणि सकस आहार कसा असला पाहिजे, खाणपणाकडे विशेष लक्ष दिल्या पाहिजे अशा अनेक गोष्टीवर मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या कुमारी छाया खणके मॅडम यांनी देखील मुलींना वेगवेगळ्या समित्या तयार करून, त्या त्यावर आपले आरोग्य, गुड टच बॅट टच आणि आहार आरोग्य आणि आपण परिधान केलेले कपडे आणि मानसिक आणि शारीरिक आरोग्य कसे जपले पाहिजे या सगळ्या गोष्टीचे मार्गदर्शन सुद्धा करण्यात आले. त्याच प्रकारे अनेक पालकांनी कुमारी मयुरा अवताडे मॅडम यांना आरोग्य विषयी अनेक प्रश्न किंवा त्यांना असणाऱ्या अडचणी विचारण्यात आल्या आणि अवताडे मॅडमनी त्यांचे प्रश्नांचे निराकरण केल.
वर्ग दहाची विद्यार्थीनी कु श्रावणी सातघरे, माता पालक संघाचे श्रीमती पिंपळकर ,सौ. झाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी श्रद्धा कोमटी यांनी केले तर आभार प्रदर्शन सुजाता ढोके मॅडम यांनी केले. कार्यकमाची सांगता महाराष्ट्र गीताने झाली. कार्यक्रमाच्या यशवीते साठी सर्व शिक्षक वृंदानी सहकार्य केले.






