दारव्हा वार्ताहर
आज दि. 18 ऑगस्ट 2025 ला सकाळी 10 वाजता अँटी – रॅगिंग सप्ताह चा समारोपीय कार्यक्रम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यवतमाळ व तालुका विधी सेवा समिती दारव्हा तसेच मुंगसाजी महाराज महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील चकवे सर होते. प्रमुख व्याख्याते म्हणून देवेंद्र पतंगे साहेब सहन्यायाधीश दिवाणी न्यायालय उच्च स्तर त्याचप्रमाणे दारव्हा वकील संघाचे सचिव श्री. योगेश ठाकरे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते देवेंद्र पतंगे साहेब यांनी विद्यार्थ्यांना अँटी रॅगिंग म्हणजे काय? संदर्भातले कायदे व कायदेशीर बाबी विस्तृतपणे समजून सांगितल्या. अँटी रॅगिंग सप्ताहामध्ये वादविवाद स्पर्धा, पोस्टर कॉम्पिटिशन, स्लोगन कॉम्पिटिशन व निबंध स्पर्धा इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. त्या सर्व स्पर्धेमध्ये गुणानुक्रमे प्रथम, द्वितीय,तृतीय व प्रोत्साहनपर आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन अतिथींच्या हस्ते गौरव करण्यात आला.
वादविवाद स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक शोएब शेख बीए 3, द्वितीय क्रमांक शैलेश दारासिंग तुनगर बीए 1 तृतीय क्रमांक कु. वेदांती नागापुरे आणि प्रोत्साहन पर अभिषेक प्रभाकर निचळे बीए 1 यांनी पटकाविले. स्लोगन कॉम्पिटिशन प्रथम क्रमांक पवन राजू लोंढे बीए 1, द्वितीय क्रमांक काजल पांडुरंग नागापुरे बीए 1, तृतीय क्रमांक संमेक विश्वनाथ मुधाने आणि आदित्य मंगल गायकवाड यांना विभागून देण्यात आला. पोस्टर कॉम्पिटिशन क्रमांक एक उज्वल संतोष ढोले, क्रमांक दोन सुमित साखरकर व रोशन रमेश पवार यांना विभागून देण्यात आला. तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला आदर्श सुरेश गायकवाड व मोहम्मद नोमान मोहम्मद निसार निबंध स्पर्धा प्रथम क्रमांक अंकित रवी निचडे बीए 3, द्वितीय क्रमांक आरती सतीश बादल बीए 1, तृतीय क्रमांक वैष्णवी विजय तट्टेकार बीए 2 यांना देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य व अँटी रॅगिंग समितीचे प्रभारी प्रा. डॉ. प्रशांत बागेश्वर यांनी केले. कार्यक्रमाचे संचलन कला शाखेचे प्रमुख प्रा. डॉ. संतोष चतुर यांनी तर आभार प्रदर्शन गणेश वानखेडे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाची अँटी रॅगिंग समिती, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक कर्मचारी यांनी अथक प्रश्न परिश्रम घेतले.






