यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा अभिनव उपक्रम…
भद्रावती
अमली पदार्थाचे वाढते सेवन व महिला अत्याचाराच्या वाढलेल्या घटना लक्षात घेता विद्यार्थ्यांना कायदेविषयक ज्ञान मिळावे यासाठी यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चीचोर्डी, भद्रावती येथे
अमली पदार्थ व महिला सुरक्षा कायदे विषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी, भद्रावती येथे अमली पदार्थ व महिला सुरक्षा कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष प्राचार्य डॉ सुधीर मोते, प्रमुख मार्गदर्शक पोलीस स्टेशन भद्रावती चे उपनिरीक्षक धोंगडे साहेब व प्रियंका गेडाम पोलीस उपनिरीक्षक हे व्यासपीठावर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना कायदेविषयक ज्ञान प्राप्त व्हावे व जनजागृती व्हावी या उद्देशाने महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

पोलीस उपनिरीक्षक प्रियंका गेडाम यांनी महिलांवर होणारे अत्याचार व महिला सुरक्षा विषयक कायदे याविषयी विस्तृत असे मार्गदर्शन केले. चांगला स्पर्श व वाईट स्पर्श या संबंधित विद्यार्थ्यांना माहिती दिली. विद्यार्थिनींना कुठलीही समस्या उद्भवल्यास त्यांनी सरळ आई-वडील,शिक्षक व पोलीस यांना पूर्ण घटना कळवावी असे सांगितले. तसेच उपनिरीक्षक भोंगळे साहेब यांनी अमली पदार्थाचे सेवन मानवाला कसे घातक आहे. अमली पदार्थाचे सेवन केल्यास व ते जवळ बाळगल्यास आपल्याला कोणत्या प्रकारची शिक्षा होते याविषयी विस्तृत विवेचन केले. आपल्या परिसरात कुठेही अमली पदार्थाची विक्री आढळल्यास त्वरित पोलीसांना संपर्क करण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सामान्य परिस्थितीतून प्रयत्नांची पराकाष्टा करत उपस्थित दोन्ही व्यक्तिमत्व यशस्वी झालेत. आपण यांचा आदर्श घ्यावा व अभ्यासात सातत्य राखावे असे मार्गदर्शन प्राचार्य सुधीर मोते यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. किशोर ढोक यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ ज्ञानेश हटवार यांनी केले तर आभार प्रदर्शन वर्ग बारावीची विद्यार्थिनी कुमारी प्रियंका चौधरी हिने केले. कार्यक्रमाला प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी, विद्यार्थ्यीनी मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. प्रेमा पोटदुखे, प्रणिता बोकडे, हरिहर मोहरकर यांनी परिश्रम घेतले.






