spot_img
spot_img
29 C
New York
Friday, July 31, 2026

जिल्हास्तरीय देशभक्तीपर गीत स्पर्धा…

कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक असोसिएशन भंडाराचा अनोखा उपक्रम

भंडारा प्रतिनिधी- दि. 17 ऑगस्ट


भंडारा जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक असोसिएशन भंडारा द्वारा आयोजित जिल्हास्तरीय ऑनलाईन देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा रविवार दि.17 ऑगस्टला पार पडली.


या स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण 45 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध असे रंगारंग देशभक्तीपर गीते सादर केली. स्पर्धेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात आला. कै. शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालय, कार्धा. ची कुमकुम रविकुमार उके हिने प्रथम क्रमांक पटकवीला. शशिकांत दैठणकर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय बारव्हाची प्रतीक्षा सदानंद मेश्राम हिने द्वितीय क्रमांक, तर तृतीय क्रमांकाची मानकरी परी राजेश भटृड, शिवाजी कृषी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय लाखांदूर ही ठरली. उत्तेजनार्थ क्रमांक अमन अरविंद डोंगरे, मनोहरभाई पटेल महाविद्यालय साकोली, करिना ब्रिजलाल बुधे, कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय करडी ,सोनल शंकर देशमुख, लोकमान्य टिळक राष्ट्रीय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तुमसर, अमित यादवराव चवडे, स्व. निर्धनराव पाटील वाघाये कनिष्ठ महाविद्यालय रेंगोला/ मांगली यांनी मिळवला.


सदर ऑनलाइन स्पर्धेचे अध्यक्षस्थान सेवानिवृत्त प्राध्यापक श्री. अंकुश तितीरमारे यांनी भूषविले तर उद्घाटन म. रा. क. म. मराठी विषय शिक्षक महासंघाचे राज्यसचिव प्रा. बाळासाहेब माने ( मुंबई) यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पांडुरंग कंद, डॉ. अंजना खताळ, डॉ. ज्ञानेश हटवार, प्रा. दिलीप जाधव, प्राचार्या विजया मने, प्रा.संजय लेनगुरे प्रा. संजय पाटील ( रायगड ) प्रा. अंकुश प्रकाश, प्रा. यश पवार, प्रा. नामदेव मोरे, प्रा. पवन कटरे यांनी उपस्थिती दर्शविली. स्पर्धेचे परीक्षण डॉ. शालिनी तेलरांधे, प्रा.कावेरी खुरणे, प्रा.अंजली रघाटाटे, प्रा वसुधा रामटेके यांनी केले.


सूत्रसंचालन प्रा. जितेंद्र टिचकुले यांनी केले तर आभार प्रा. प्रांजली दरवळकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. दिलीप करंबे, प्रा. छगन झंजाळ, प्रा. निशिकांत ईश्वरकर, प्रा. प्रवीण वंजारी, प्रा. सुधीर लिल्हारे, प्रा. प्रियंका बोपचे,प्रा. दुर्गेश वंजारी, प्रा. केशव कापगते, प्रा. मनोहर सिंगनजुडे, प्रा.कोमल मानकर, प्रा.अनिल वैद्य, प्रा. अश्विनी गणवीर , प्रा. भूपेंद्र भुसारी,प्रा. अनिल रामटेके , प्रा. गीता प्रधान , प्रा. ओमप्रकाश भुते , प्रा. सुजाता गोमासे , प्रा. प्रीती कांबळे , प्रा. रेखा तितीरमारे प्रा. सरिता गावळ, प्रा. विजय शेंडे प्रा. प्रीती कांबळे, प्रा. श्रीराम कांबळे, प्रा. धनराज करचाल, प्रा. यांनी अथक परिश्रम घेतले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!