भद्रावती
राज्य क्रीडा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा संचालनालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने भद्रावती तालुक्यात क्रीडा स्पर्धा सुरू झालेल्या आहेत.
भद्रावती तालुका बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेत यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी होऊन जिल्हा स्तरावर प्रतिनिधित्व करणार आहेत. नीलकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाच्या इंडोअर स्टेडियम मध्ये नुकत्याच पार पडलेल्या बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेत १९ वर्षे वयोगटातील तीन खेळाडू व १७ गटातील एक खेळाडू यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावतील १९ वर्षे वयोगटाखालील मुलांमध्ये शर्विल हटवार, आयान शेख, नमन भुसारी या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड झाली. तर १७ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये उज्वल डेंगळे याची निवड झालेली आहे.
बुद्धिबळ स्पर्धेत जिल्हास्तरावर निवड झालेल्या खेळाडूंचे भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे सचिव प्रा. डॉ. कार्तिक शिंदे सर, माजी प्राचार्य डॉ जयंत वानखेडे, विश्वस्त भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती, प्राचार्य डॉ सुधीर मोते, क्रीडा शिक्षक प्राध्यापक रमेश चव्हाण सर, किशोर ढोक, नरेश जांभुळकर सर, डॉ ज्ञानेश हटवार व समस्त प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.






