भद्रावती : महाराष्ट्र शासन महसूल वनविभाच्या विद्यमाने दि.१ ऑगस्टला महसूल दिनाचा शुभारंभ करून दि.१ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट पर्यंत “महसूल सप्ताह – २०२५” साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाचे औचित्य साधून ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ तहसील कार्यालय, भद्रावतीचे वतीने स्थानिक स्वागत सेलिब्रेशन येथे सोमवार दि. ०४ ऑगस्टला सकाळी १० ते दु. ४ पावेतो शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात जातीचे प्रमाणपत्र, शेतकरी ओळख क्रमांक काढणे, शिधापत्रिका वाटप, रहिवासी दाखले काढणे, महसूल विभागाच्या विविध सेवा, आधारकार्ड अद्यावत करणे, फेरफार, उत्पन्न प्रमाणपत्र, पीएम किसान नोंदणी, संजय गांधी निराधार योजना, सातबारा, विविध शासकीय योजना या सेवा पुरविण्यात येणार आहे. या शिबिरात भद्रावती मंडळातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे की, सदर शिबीराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. असे आवाहन मंडळ अधिकारी समीर वाटेकर यांनी केले आहे.






