spot_img
spot_img
8 C
New York
Thursday, March 26, 2026

बँकेने शेकऱ्यांच्या पिक कर्जाची सक्तीने वसुली करू नका

सक्तीने पिक कर्जवसुली केल्यास प्रहार च्या पद्धतीने उत्तर देऊ

चंद्रपूर प्रहार जनशक्ती पक्षाचा इशारा

निवडणुकीच्या काळात आगामी सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कोरा कोरा अशी घोषणा दिल्या होत्या. परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा झालेला नाही. त्यांचेवर असलेले पिक कर्ज माफ झालेले नाही व त्याबद्दल कुठलाही निर्णय शासनाने घेतलेला नाही, त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्याही बँकेने शेतकऱ्यांचे पिक कर्ज सक्तीने वसुली करू नये असा इशारा प्रहार जनशक्ती पक्ष चंद्रपूर यांनी दिलेला आहे. जर एखाद्या बँकेकडून अशा प्रकारची सक्तीने पिक कर्ज वसुली केल्यास त्याला प्रहारच्या पद्धतीने उत्तर देऊ असे ठणकावून प्रहार जनशक्ती पक्ष चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष शेरखान पठाण यांनी सांगितले.

चंद्रपूर जिल्ह्यातील शेगाव बुद्रुक या गावा जवळील एका ग्रामीण भागातील शेतकऱ्याला शेगाव येथील एका बँकेने पिक कर्ज वसुली बाबत पत्रक पाठवल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्ष शेगाव यांची भेट घेतली त्यावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शेरखान पठाण तसेच विनोद उमरे, अक्षय बोंदगुलवार, अमोल दातारकर, राकेश भुतकर आणि अन्य कार्यकर्ते यांनी शेगाव येथील बँकेच्या शाखा व्यवस्थापक यास समजावणी देऊन सक्तीने पिक कर्ज वसुली करू नये असे ठणकावून सांगितले. तसेच जिल्ह्यामध्ये कोणत्याही बँकेने सक्तीने पिक कर्ज वसुली करू नये असे केल्यास प्रहार कार्यकर्ते यांच्याशी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा अशी त्यावेळेस त्यांनी आवाहन केले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!