spot_img
spot_img
6.4 C
New York
Saturday, November 28, 2026

श्री शिव छत्रपती महाविद्यालयात रस्ता सुरक्षा अभियान जनजागृती

पुणे


दिनांक २०/ ०१/ २०२६ रोजी श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर व पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान निमित्ताने आयोजित रस्ता सुरक्षा महिना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मोटार वाहन निरीक्षक श्री जयंत मोरे व सौ गीतांजली काळे, पत्रकार श्री नितीन कांबळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.आर.डी.चौधरी, कनिष्ठ महाविद्यालय समन्वयक व उपप्राचार्य प्रा.पी.एस.लोढा, पर्यवेक्षक प्रा एस.ए. श्रीमंते, कला विभाग प्रमुख प्रा.आर.एस.कांबळे उपस्थित होते.


श्री जयंत मोरे यांनी मार्गदर्शन करताना शिक्षक व विद्यार्थ्यांनी रस्त्याने जाता येता व वाहन चालवताना आपली काळजी घ्यावी.वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन करून रस्ते अपघात कमी होण्यासाठी मदत करावी. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष ॲड.संजय शिवाजीराव काळे व अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.व्ही.बी. कुलकर्णी यांनी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ.आर.डी चौधरी यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी वाहतुकीच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. अपघातग्रस्त लोकांना सहकार्याची भावना ठेवून त्यांना मदत करावी असे सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.निलेश आमले तर आभार प्रा पुनम मनसुख यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी शिक्षक प्राध्यापक शिक्षकेत सर्वांसाठी मोठ्या संख्यत उपस्थित होते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!