वीर जवानांचा ह्रदय सत्कार…….
भद्रावती
कारगिल युद्धात भारत मातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या वीर हृतात्मा सैनिकांना भद्रावतीमध्ये जयहिंद फोडेशन चंद्रपूर च्या वतीने मुसळधार पावसाची तमा न बाळगता पावसात येऊन अनेकांनी वीरांना श्रद्धांजली अर्पण केली व कारगिल विजय दिवस साजरा केला.
दरवर्षी जयहिंद फाउंडेशन तर्फे हा कारगिल विजय दिन विविध उपक्रमाणे साजरा करण्यात येतो. यावर्षी चित्रकला स्पर्धा, भाषण, देशभक्तीपर गीत, व कारगिल युद्धात ज्या सैनिकांनी सक्रिय सहभाग होता त्या सैनिकांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्रा. धनराज आस्वाले सर, श्रीनिवास शिंदे मेमोरियल चारिटेबल स्ट्रसट चे अध्यक्ष, तर प्रमुख अतिथी म्हणून मा. योगेश पारधे सर, पोलीस इन्स्पेक्टर, भद्रावती व मा. डाॅ प्रकाश महाकाळकर सर, गट शिक्षणाधिकारी, भद्रावती, प्रा. डॉ ज्ञानेश हटवार सर, यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती, मा. विजय तेलरांधे अध्यक्ष जय हिंद फाउंडेशन चंद्रपूर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वल करून, भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन व अमर विरांना पुष्प चक्र अर्पण करण्यात आले. लगेच कु. काव्या खोब्रागडे या चिमुकली च्या मधुर स्वागतगीताने कार्यक्रमाला रीतसर सुरुवात झाली. मान्यवरांचे स्वागत पुस्तक, पुष्प, व संविधान प्रत देवून करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित शूर वीर जवानांचा मान्यवाराच्या हस्ते शाल, पुष्प, संविधान प्रत देवून सत्कार करण्यात आला. सत्कार मूर्ती म्हणून मा. विलासजी देठे, मा. अजित राम साहेब, मा. नाकाडे साहेब, मा. प्रमोद रामटेके साहेब, मा. राकेश फुले साहेब , सोयाम मेजर व इतर माजी सैनिक, नामदेव मांडवकर, अरूण मते, अरूण खापने, विदे सर, घोटेकर सर , जनार्दन शिवरकर काका व मांडवकर ताई, खापने ताई, फुले ताई, रामटेके ताई व परीक्षक यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. चित्रकला परीक्षेत प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तीर्ण विद्यार्थी या सर्वांना मान्यवरांचे हस्ते बक्षीस देण्यात आले.
प्रास्ताविक माजी सैनिक विजय तेलरांधे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालीक दानव सर व आभार क्षितिज शिवरकर सर यांनी केले. या कार्यक्रमाला भर पावसातही माजी सैनिक तसेच सामान्य देशभक्त नागरिकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीकांत सर, शिवरकर सर, ठमके सर, साई कला प्रकाश मंडळाचे पदाधिकारी, आजी माजी सैनिक, सौ. दर्शना विजय तेलरांधे ताई, व सर्व स्पर्धेत भाग घेणारे विद्यार्थी यांचा हातभार लागला.






