spot_img
spot_img
24.4 C
New York
Saturday, June 6, 2026

शालेय साहित्य व मिठाईवाटप करून साजरा होणार आमदार सुधीरभाऊ मनगंटीवार यांचा वाढदिवस

भद्रावती : जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भारतातील 12 गड किल्ल्यांचा समावेश करणारे, विधानसभेमध्ये जनतेच्या विविध प्रश्नांना वाचा फोडणारे, गोर गरिबांचे कैवारी, कर्तव्यदक्ष, विकास पुरुष, आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त लोकसेवा मंडळ संचालित लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय व लोकमान्य ज्ञानपीठ भद्रावती चे वतीने गरीब व गरजू विद्यार्थ्यांना नोटबुक व मिठाई वितरण सोहळ्याचे आयोजन लोकमान्य विद्यालयाचे भव्य सभागृहात करण्यात आले आहे.

दिनांक 30 जुलै 2025 ला सकाळी ठीक 9.00 वाजता विठ्ठल मंदिर देवस्थान किल्ला वॉर्ड येथे विठ्ठल रखुमाई मूर्तीचे पूजन करून आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना दीर्घायुष्य लाभो व पुढे सुद्धा भाऊंच्या हातून समाज हिताचे कार्य घडून जनतेच्या समस्या भाऊच्या माध्यमातून पूर्ण होवोत अशी प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी करण्यात येणार आहे.त्यानंतर सायंकाळी 4.00 वाजता लोकमान्य विद्यालयाचे भव्य सभागृहामध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना नोटबुक वितरण व मिठाई वितरण सोहळा पार पडणार आहे या सर्व कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांतजी गुंडावार यांनी केले आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!