भद्रावती
डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालय, भद्रावती येथे कारगिल विजय लग्न उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयात कारगिल विजय दिनानिमित्त एनसीसी कॅडेट्ससाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली. या कार्यक्रमात अध्यक्ष प्राचार्य प्रमोद पाठक, प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव डॉ. कार्तिक नी. शिंदे उपस्थित होते.
एनसीसी कॅडेट्सनी प्रश्नमंजुषा स्पर्धेत उत्साहाने भाग घेतला आणि कारगिल युद्धाबद्दलचे त्यांचे ज्ञान प्रदर्शित केले. डॉ. कार्तिक नी. शिंदे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “कारगिल विजय दिन” हा भारतीयांचा गौरवाचा दिवस आहे. भारत मातेच्या रक्षणासाठी आपल्या सैनिकांनी अंत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पाकिस्तानी सैनिकांना हुसकावून लावले. या युध्दात शहीद झालेल्या सैनिकांच्या शौर्याची आणि बलिदानाची आठवण करून देतो. एनसीसी कॅडेट्समध्ये देशभक्ती आणि लष्करी इतिहासाबद्दल जागरूकता वाढवणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅडेट स्वाती हिने केले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील प्रा. डॉ प्रशांत पाठक, प्रा. विशाल प्रसाद, प्रा. नेहा मानकर , प्रा. प्रज्ञा लांडे, प्रा. कपिल राऊत , प्रा. राजेंद्र सावडे, प्रा. प्रीती कंदीकट्टीवार व शिक्षकेतर सीमा हवेलीकर व पूनम काळे इत्यादी सहकार्याचे सहभाग लाभले.






