spot_img
spot_img
23.4 C
New York
Saturday, June 6, 2026

भद्रावतीचे विजय गेडाम राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रपती पोलिस पदकाने सन्मानित

भद्रावती : पोलिस दलात कार्यरत असताना उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना शासनाकडून सन्मानित करण्यात आले आहे. भद्रावतीच्या लोकमान्य विद्यालयात दहावी पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या विजय गेडाम यांना मुंबई येथे गुरुवार दि.२६ जूनला पार पडलेल्या एका शासकीय समारोहात महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते राष्ट्रपती पोलिस पदक प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे.विजय गेडाम हे सध्या चंद्रपूर येथील रामनगर पोलिस स्टेशन येथे पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. यांच्यासह महाराष्ट्र राज्यातील एकूण ८३ अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना. राष्ट्रपती शौर्यपदक, राष्ट्रपती पोलीस पदक व उत्कृष्ट सेवेबद्दल पदक बहाल करण्यात आले. यात गडचिरोली येथील राष्ट्रपती शौर्य पदक ४१, राष्ट्रपती पोलीस पदक ०३ आणि उत्कृष्ट सेवेबद्दल ३९ असे एकूण ८३ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील मरेगाव नवरगावातील उद्धव गेडाम यांचे ते सुपुत्र असून वडिलांना भद्रावतीच्या दारूगोळा कारखान्यात नोकरी लागल्यानंतर ते येथे स्थायी झाले .विजय यांनी पहिली ते चौथी पर्यंत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेतले नंतरचे दहावीपर्यंतचे शिक्षण भद्रावतीच्या लोकमान्य विद्यालयात घेतले.त्यानंतर सन १९८९ मध्ये ते पोलिस विभागात कमांडो या पदावर रूजू झाले. त्यानंतर त्यांनी नक्षलसेलमध्ये ७ वर्षे कामे केली. या ७ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक चांगली कामे केली. याच कामाची दखल घेऊन त्यांना सन २०२२ मध्ये राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर करण्यात आले आहे. नक्षलसेलमध्ये ७ वर्षे काम केल्यानंतर त्यांनी राजुरा पोलिस ठाण्यात ६ वर्षे काम केले. सावली तालुक्यातील पाथरी पोलिस चौकीतही त्यांनी काही वर्षे काम केले. त्यानंतर परत ६ वर्षे नक्षलसेलमध्ये ते कार्यरत होते, महामार्ग पोलिस विभागात सहायक पोलिस उपनिरीक्षक या पदावर काम केले.आता ते चंद्रपूरच्या रामनगर पोलीस स्टेशन येथे पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहे.सोबतच त्यांना व इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना मुंबई येथे पोलीस विभागाच्या एका समारोहात महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी देखील सन्मानित केले. या सर्वांचे जिल्ह्याच्या पोलीस विभागात अभिनंदन केल्या जात आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!