spot_img
spot_img
24.4 C
New York
Saturday, June 6, 2026

साईप्रकाश कला अकादमीची ‘फाइन आर्ट’ परिक्षेत बाजी…


भद्रावती –

भारती कला केंद्र, लखनौ ( उ.प्र.) तर्फे एप्रिल २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या ‘फाइन आर्ट ‘ विषयात भद्रावती येथील साईप्रकाश बहु.कला व शिक्षण संस्था द्वारा संचालित ‘ साईप्रकाश कला अकादमीचा निकाल १००% लागला असून प्रवेशिका ते तृतीय वर्षापर्यंत एकूण १३० विद्यार्थी या परिक्षेत सहभागी झाले होते. पैकी ९८ विद्यार्थी प्रथम तथा प्राविण्य श्रेणी मिळवून उत्तीर्ण झाले.


अकादमीमधून दरवर्षी प्रमाणे या वर्षीही विशेष योग्यता व प्रथम श्रेणीतून अधिकाधिक यश प्राप्त करण्याची परंपरा विद्यार्थ्यांनी राखली आहे. प्रवेशिका प्रथम परिक्षेत यश पाप्पुलवार, प्रवेशिका पूर्ण मध्ये वृक्षा जंगले, प्रारंभिक प्रथम मध्ये कौशिक डांगे, प्रारंभिक पूर्ण मध्ये प्रज्वल लोखंडे, प्रथम वर्ष मध्ये तिथी मोघे, द्वितीय वर्ष मध्ये हर्षदा वरारकर तर तृतीय वर्ष मध्ये सांजवी उज्ज्वलकर व देवांशी चरडे या दोघींनी सारखे गुण मिळवून प्रथम येण्याचा मान पटकावला. आजतागायत अकादमीचे बरेच विद्यार्थी फाईन आर्ट मधील ‘ विशारद ‘ परिक्षा उत्तीर्ण झाले असून अकादमीचे प्रशिक्षक क्षितीज शिवरकर व सचिन बेर्डे हे विशारद असून नेहा प्रसाद व विनोद ठमके हे एम.ए.झालेले आहेत.

कला अकादमीच्या फाईन आर्ट मधील घवघवीत यशाबद्दल पालकांनी अकादमीच्या सर्व शाखांमधील प्रशिक्षकांचे विशेष आभार मानले. केंद्र संचालक विनय वासनिक तथा संस्थेचे कार्यकारी सदस्य शालिक दानव, सुरेंद्र हनुमंते, राणी हनुमंते, देवयानी रामटेके, श्रीकांत भिडीकर, कपिल ढोके यांनीही विद्यार्थी व कला प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!