spot_img
spot_img
24 C
New York
Thursday, July 30, 2026

यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेशोत्सव साजरा…


भद्रावती


भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचलित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे आज शाळेचा पहिला दिवस असल्याने प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.

प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ जयंत वानखेडे विश्वस्त भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती, प्रमुख अतिथी प्रफुल चटकी माजी उपनगराध्यक्ष ,माजी विद्यार्थी भद्रावती, प्राचार्य डॉ सुधीर मोते, प्रा. सौ. वानखेडे मॅडम, प्रा. अतुल गुंडावार सर, पालक प्रतिनिधी सतीश पुरी, मनोज सोनटक्के व श्रीमती निर्मला पुरी हे व्यासपीठावर उपस्थित होते.

यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे शैक्षणिक सत्र २०२५-२६ चा आज प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. सकाळी ७.३० राष्ट्रगीत, परिपाठ झाल्यानंतर परिसरात विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. प्रभात फेरीनंतर यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात मान्यवरांचे उपस्थित प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना आपल्या जीवनाचे शिल्पकार हे गुरु आहेत. आपल्या नवजीवनाची सुरवात शाळेतून करीत आहे. शाळेत तील पहिल्या दिवसाला विशेष महत्त्व आहे असे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना माजी प्राचार्य तथा संस्थेचे विश्वस्त डॉ जयंत वानखेडे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व आपले निश्चित ध्येय गाठण्यासाठी आनंददायी वातावरणात शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे असे सांगितले.

यावेळी मान्यवर अतिथींच्या हस्ते आठवीत प्रवेशित व नवोदित विद्यार्थ्यांचे शालेय पुस्तके व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ सुधीर मोते यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्माराम देशमुख यांनी केले, तर आभार प्रदर्शन शबाना सय्यद मॅडम यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी सहकार्य केले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!