spot_img
spot_img
24.4 C
New York
Saturday, June 6, 2026

बच्चू कडू यांचे समर्थनार्थ वरोरा मध्ये प्रहार चे आंदोलन.

पाण्याच्या टंकी वर चढून वीरुगरी पद्धतीने आंदोलन करण्याचा प्रयत्न.

प्रहार जनशक्ती पक्षाचे पक्षप्रमुख माजी मंत्री बच्चू कडू हे मागील सहा दिवसापासून गुरकुंज मोझरी येथे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी सोबतच दिव्यांग बांधवांच्या निधी वाटपाबद्दल व अन्य काही मागण्या पूर्ततेसाठी मागील सहा दिवसापासून अन्न त्याग आंदोलनाला बसलेले आहे. परंतु राज्य सरकारने अजूनही यांची दखल घेऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्या नसल्यामुळे व बच्चू कडू यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालल्यामुळे प्रहार ने ठिकठिकाणी आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख शेरखान पठाण यांच्या नेतृत्वात वरोरा येथे काल आंदोलन करण्यात आले. त्यावेळी शेकडोच्या संख्येने प्रहार कार्यकर्ते एकत्रित आले होते.

सुरवातीला पिण्याच्या पाण्याच्या टंकी वर चढून आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण पोलीस यांनी शेरखान पठाण व अन्य कार्यकर्त्यांना टंकी खालीच रोखून धरले. भारत माता की जय अशा घोषणा व सोबतच अन्य घोषणा देण्यात आल्या. त्या नंतर वरोरा चे तहसीलदार योगेश कौटकर यांचेमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
हे आंदोलन जवळपास एक तास चालले आणि अगदी शांततेच्या मार्गाने आंदोलन त्या वेळी करण्यात आले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!