spot_img
spot_img
27.4 C
New York
Wednesday, July 29, 2026

दुचाकीची म्हशीला जबर धडक एक ठार तर एक गंभीर जखमी

शेगाव बु ते चारगाव खुर्द च्या मधात राष्ट्रीय महामार्ग 353 ई वरील घटना


वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या अर्जुनी येथील युवक शेगाव येथे शेती उपयोगी साहित्य घेण्या करिता आले होते. शेती उपयोगी साहित्य खरेदी केल्या नंतर शेगाव वरून स्व गावी अर्जुनी (तुकुम) येथे जात असताना भेंडाळा ते चारगाव याचे मधात दुचाकीने जात असताना म्हशीला जबर धडक बसून अर्जुनी येथील ३२ वर्षीय युवक राहुल दामोधर जुंम्भाळे व सोबत असलेला आणखी एक युवक राजेंद्र देशमुख वय ४५ वर्षे हे गंभीर जखमी झाले असता त्यांना वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेले असता राहुल जुंम्भाळे यांना डॉक्टर यांनी मृत घोषित केले. व देशमुख हा युवक गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहे.


सध्या शेती हगमाला वेग आला असून मोठ्या प्रमाणात शेती विषयक साहित्याची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना शेगाव बु येथे यावे लागते. त्यातच अशा प्रकारे मोकाट असलेल्या जाणवरे राष्ट्रीय महामार्ग वर मोकाट फिरत असल्याकारणाने नेहमीच छोटे मोठे अपघात घडतंच असता. मृत राहुल जुंम्भाळे हा युवा शेतकरी पुत्र असून एकुलता एक होता त्यामुळे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसलेला असून त्याला एक १ वर्षाचा मुलगा असून अगदी अल्प वयातच पोरके होण्याची वेळ आलेली आहे. राहुल याचे पच्यात शेतकरी वडील आई पत्नी मुलगा असा बराचसा आप्त परिवार आहे.
घटनेचा पुढील तपास शेगाव पोलीस हे करीत आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!