सहकार क्षेत्रातील नेत्यांनी केला भाजपात प्रवेश
चिमूर ता. प्र.
केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाचे शासन आहे. राज्यातील पक्षनेतृत्वावर विश्वास ठेवून चिमूर तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे सहकार क्षेत्रातील दिग्गज नेते संजयजी डोंगरे तथा नेरी येथील सहकार नेते कृषी उत्पन्न बाजार समिती चिमूरचे माजी संचालक प्रशांतजी पिसे यांनी चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भाजपात प्रवेश केला.
भाजपचे प्रदेश अध्यक्ष, राज्याचे महसूल मंत्री ना. चंद्रशेखरजी बावनकुळे तथा माजी आमदार मितेशजी भांगडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कांग्रेस पदाधिकारी यांनी कांग्रेस पक्षाला रामराम केला व भाजपात प्रवेश केला.या मुळे
चिमूर तालुक्यात काँग्रेसला मोठी खिंडार पडली आहे.






