spot_img
spot_img
20.7 C
New York
Monday, June 8, 2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त “एक पेड़ मां के नाम” या मोहिमे अंतर्गत वृक्षारोपण

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान श्री केंद्रीय विद्यालय चांदा यांचा उपक्रम

भद्रावती : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, “एक पेड़ मां के नाम” या मोहिमेअंतर्गत ५ जून रोजी पंतप्रधान श्री केंद्रीय विद्यालय आयुध निर्माण कारखाना चांदा परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पालक, विद्यार्थी आणि शाळेतील कर्मचारी बलराज जगताप, राजश्री कोटकर, सुमेध लोखंडे, सोनाली बेहेरे यांनी एकत्रितपणे विविध प्रकारची रोपे लावली.

प्राचार्या स्वाती विश्वकर्मा यांनी रोपे लावून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर उपस्थित सर्व पालक आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या आईच्या नावाने प्रत्येकी एक रोप लावले. या भावनिक उपक्रमाने सर्वांच्या हृदयाला स्पर्श केला आणि पर्यावरण संरक्षणाबद्दल एक नवीन जाणीव जागृत केली. कार्यक्रमाच्या शेवटी, सर्व सहभागींनी शपथ घेतली की ते लावलेल्या रोपांची पूर्ण निष्ठेने आणि जबाबदारीने काळजी घेतील आणि पर्यावरणाच्या रक्षणात योगदान देतील. “एक पेड माँ के नाम” मोहीम ही केवळ पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने एक महत्त्वाची पायरी नाही तर ती मातृप्रेमाला समर्पित एक सुंदर उपक्रम आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!