हितेश कोल्हे ७९.४० % गुण घेत शिंदे विद्यालयातून प्रथम..
नुकताच महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेच्या वतीने वर्ग दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. या निकालात यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती ने उत्तम निकालाची परंपरा कायम राखली. या विद्यलयातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा पालकांसोबत सत्कार करण्यात आला. या सोहळ्याचे अध्यक्ष प्रा.डाॅ कार्तीक शिंदे सचिव भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती, प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ सुधीर मोते, महादेव बरडे माजी प्राचार्य, दिपक शेंडे पालक प्रतिनिधी उपस्थित होत.
नुकताच माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेच्या वतीने दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. यात यशवंतराव शिंदे विद्यालय चिचोडी भद्रावती ने सुद्धा उज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार डॉ कार्तिक शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. हितेश कोल्हे या विद्यार्थ्याने ७९.४०% गुण घेत महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान पटकावला तर वेदिका शेंडे या विद्यार्थिनीने ७५% गुण घेत विद्यालयातून द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला, तसेच गजानन चौधरी या विद्यार्थ्याने ७१.४० % गुण घेत विद्यालयातून तृतीय स्थान पटकावले आहे.
यावेळी विद्यार्थ्यांनी व पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ सुधीर मोते सर यांनी केले. सूत्रसंचालन सुहास कोल्हे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन सय्यद मॅडम यांनी केले . कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक , प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.






