भद्रावती
आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे वतीने वर्ग दहावीचा निकाल आँनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात आला. या निकालात यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती येथील हितेश कोल्हे या विद्यार्थ्याने ७९.४० % गुण घेत विद्यालयातून प्रथम येण्याचा मान पटकावला. यंदाही यशवंतराव शिंदे विद्यालयाने उत्तम निकालाची परंपरा कायम राखली आहे.
नुकताच माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेच्या वतीने दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. या निकालात यशवंतराव शिंदे विद्यालय चिचोर्डी, भद्रावती ने सुद्धा उज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. हितेश कोल्हे या विद्यार्थ्याने ७९.४०% गुण घेत महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान पटकावला तर वेदिका शेंडे या विद्यार्थिनीने ७५% गुण घेत विद्यालयातून द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला, तसेच गजानन चौधरी या विद्यार्थ्याने ७१.४० % गुण घेत विद्यालयातून तृतीय स्थान पटकावले आहे.
या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व अभिनंदन भद्रावती शीक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ विवेक शिंदे, सचिव डॉ कार्तिक शिंदे, सहसचिव डॉ विशाल शिंदे, डॉ जयंत वानखेडे विश्वस्त, प्राचार्य डॉ सुधीर मोते, देशमुख, कोल्हे व सर्व शिक्षक, प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.






