भद्रावती : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून यामध्ये भद्रावती शहरातील श्री साई कॉन्व्हेंट ने 100% निकाल देत आपली उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.श्री साई कॉन्व्हेंट मधुन प्रथम येण्याचा मान वेदांत नगराळे या विद्यार्थ्याला मिळाला असून त्याला 93.80 टक्के गुण प्राप्त झाले आहेत. ईशिका दातारकर हिने 93.40 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. भाग्यश्री फोपरे हिने 91.80 टक्के गुण मिळवून तृतीय आली. हिमांशु नागपुरे 87.80 टक्के गुण मिळवून चौथा आला तर नैतिक आसुटकर 87.00 टक्के गुण मिळवून पाचवा आला आहे. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका कु.किरण कोथळे संस्थेच्या अध्यक्षा कांता ताई गुंडावार, प्राध्यापक अतुल गुंडावार, रुपा गुंडावार आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शिक्षक वृंद, आई वडील यांना दिले आहे.
श्री साई कॉन्व्हेंटने मारली बाजी
दहावीच्या परिक्षेचा 100% निकाल






