भिसी(प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र दहावी च्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला यामध्ये
चिमूर तालुक्यातील भिसी शहरातील श्री साई कॉन्व्हेन्ट जिविका इंग्लीश मिडीयम स्कूल व ज्युनियर कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी १००% निकाल देऊन उज्वल यशाची परंपरा कायम ठेवीत विद्यालयातून व भिसी शहरातून इंग्रजी माध्यमातून प्रथम येण्याचा मान कू. जानवी मंगेश तिखट या विद्यार्थीनीने ८६.८० टक्के गुण घेऊन मिळविला आहे. तर कू. माही संजय गुल्हाने ही विद्यालयातून ८५.४०% गुण मिळवीत दूसरी आलेली आहे तसेच कू. मृणाली तुकाराम सातपुते हिने ८३.४०%गुण मिळवीत विद्यालयातुन तिसरा क्रमांक मिळविला आहे. कु. अनन्या भोजराज बेले हिने ८०.६०% गुण घेत विद्यालयातून चौथा क्रमांक तर कु. ईश्वरी जनार्दन धानके हिने ७५.८०% गुण मिळवीत विद्यालयातून पाचवा क्रमांक प्राप्त केला. वर्ग १२ वी विज्ञान शाखेची प्रथम आलेली विद्यार्थीनी राजवी गजानन बन्सोड व व्दितीय जुईली बाबाराव रेवतकर हिने मिळविला विद्यालयातून ६ विद्यार्थी विशेष प्राविण्य प्राप्त तर ५ विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत विद्यालयाचे नावं रोशन केले या सर्व विद्यार्थ्यांचे व त्याच्या पालकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन कऱण्यात आले.
तसेच जिविका इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनियर कॉलेज चा निकाल 100 टक्के लागला असून बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी जिविका इंग्लिश मिडियम स्कूल व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कठोर परिश्रमाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला घडविण्याची किमया करीत आहे . शहरी तसेच ग्रामीण विद्यार्थ्यांना प्रगतीच्या मार्गाने वाट दाखवण्यासाठी तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला यशस्वी करणे, त्यांचा सर्वांगीण विकास करणे हेच ध्येय असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष व सदस्यांनी बोलून दाखवले. जिविका इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज च्या शिक्षकांनी सुद्धा जिद्द व चिकाटीने परिश्रम घेतल्याने हे यश संपादित झालेले आहेत सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यालयाच्या वतीने गुणवत्ता प्राप्त विद्यार्थांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री ईश्वर गजभिये, सचिव किशोर आष्टनकर, मुख्याध्यापक हर्षित उपाध्याय सर
कॉन्व्हेन्ट च्या मुख्याध्यापीका सौ शुभांगी आष्टनकर, राखी खेळकर मॅडम, अमृता देवतळे मॅडम, पालक म्हणुन श्री मंगेश तिखट, श्री. तुकाराम सातपुते, डॉ. भोजराज बेले, सौ मनिषा तिखट,सौ. सविता गुल्हाने, सौ. रश्मी धानके, निशादपरविन पठाण इतर पदाधिकारी व कॉन्व्हेन्ट तसेच शाळेच्या सर्व शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी वर्ग व पालक वर्ग उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेतील मार्गदर्शक शिक्षकवृंद व आई वडिलांना दिले.






