आनंद निकेतन कनिष्ठ महाविद्यालयाच्या गौरवात मानाचा तुरा….
वरोरा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे चा निकाल नुकताच जाहीर झाला. या निकालात आनंद निकेतन कनिष्ठ महाविद्यालय आनंदवन वरोरा येथील वाणिज्य शाखेचा ऋषिकेश मिश्रा या विद्यार्थ्याने ९७.१७ % गुण प्राप्त करत नागपूर विभागातून वाणिज्य शाखेतून अव्वल येण्याचा मान पटकाविला.
वर्ग बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला या निकालात आनंद निकेतन कनिष्ठ महाविद्यालय आनंदवन वरोरा येथील ऋषिकेश मिश्रा या विद्यार्थ्याने वाणिज्य शाखेत ९७.१७ % गुण घेत नागपूर विभागीय मंडळातून वाणिज्य शाखेतून विभागात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. त्याने प्राप्त केलेल्या घवघवीत यशाबद्दल महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ विकासभाऊ आमटे, श्री कौस्तुभ आमटे, पल्लवी आमटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मृणाल काळे, उपप्राचार्य राधा सवाने मॅडम तसेच सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याच्या या उज्वल यशाबद्दल आनंदवन परिवाराने त्याचे कौतुक केले आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थी हा शैक्षणिक प्रगतीत कुठेच कमी नाही, हे त्याच्या यशाने पुन्हा निर्विवाद सिद्ध केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आनंदनिकेतन कनिष्ठ महाविद्यालयाने क्रीडा क्षेत्रासोबतच शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.
त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व प्राध्यापक वृंदांना दिलेले आहेत. भविष्यात त्याला सीए व्हायचे आहे.






