spot_img
spot_img
18.2 C
New York
Monday, June 8, 2026

राखी राठोड मराठी विषयात ९६ गुण घेऊन नागपूर विभागातून अव्वल …

राखी राठोड कला शाखेत ९६% गुण घेऊन नागपूर विभागात अग्रेसर..

चंद्रपूर

नुकताच माध्यमिक व उच्च माध्यमिक व माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे चा बारावीचा निकाल जाहीर झाला. या निकालात डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेज हिंगणघाटची विद्यार्थिनी कुमारी राखी राठोड हीने ९६ टक्के गुण घेत नागपूर विभागात कला शाखेत प्रथम येण्याचा मान पटकावला. सोबतच मराठी विषयात ९६ गुण घेऊन यश संपादन केले. याबद्दल मराठी विषय शिक्षक महासंघाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट येथील विद्यार्थिनी कुमारी राखी राठोड हिने इयत्ता बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. तिने मराठी विषयात ९६ गुण घेऊन नागपूर विभागातून प्रथम येण्याचा मान पटकावला, तसेच समाजशास्त्र या विषयात ९९ गुण घेऊन उच्चांक गाठला आहे. तिच्या एकूण गुणांची टक्केवारी ही सुद्धा ९६% आहे. तीने नागपूर विभागातून कला शाखेतून प्रथम क्रमांकाचा मान पटकावला आहे. तिची परिस्थिती ही सामान्य आहे. विशेष म्हणजे तीची मातृभाषा ही हिंदी आहे. पण तीला मराठी भाषेबद्दल अतिशय प्रेम आहे. कठोर परिश्रम , अभ्यासातील सातत्य व मेहनतीने आणि परिस्थितीवर मात करत तिने हे यश संपादन केले आहे.

राखी राठोड ला पुढे युपीएससी परीक्षेद्वारे प्रशासकिय सेवेत जायचे आहे. त्या साठी आतापासूनच तिने ग्रंथालयात जाऊन अभ्यास सुरू केला आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य श्री नगराळे सर, मराठी विषय शिक्षिका प्रा. विद्या खेडकर मॅडम तसेच समाजशास्त्र विषयाच्या शिक्षिका प्रा. शिरपूरकर मॅडम आणि सर्व शिक्षकांना दिले आहे.

तिने प्राप्त केलेल्या उज्वल यशाबद्दल तिचे प्रत्यक्ष आँनलाईन संपर्क साधून मराठी विषय शिक्षक महासंघाचे सचिव प्रा. बाळासाहेब माने, कार्याध्यक्ष प्रा. संपत गर्जे, उपाध्यक्ष प्रा. डॉ ज्ञानेश हटवार, कोशाध्यक्ष प्रा. संजय लेनगुरे, नागपूर विभागाचे मराठी विषयाचे मुख्य नियामक प्रा. धाडसे सर, प्रा. पवन कटरे , प्रा. नामदेव मोरे, प्रा. नंदा भोयर, प्रा. गजानन जुमडे, प्रा. यशवंत पवार यांनी कु.राखी राठोड व तिच्या पालकांना फोनवरून संवाद साधून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

मराठी विषय शिक्षक महासंघाचे अध्यक्ष सुनील डिसले, दिलीप जाधव, डॉ पांडुरंग कंद, डॉ शालिनी तेलरांधे, डॉ विजय राठोड, डॉ सुधीर रायपुरकर , डॉ विठ्ठल चौथाले, प्राचार्य विजया मने, प्राचार्य सुधीर मोते, मृगा पागे, सुभाष पारिसे, अरूण मेश्राम आदी महासंघाचे पदाधिकारी व महाराष्ट्र राज्य मराठी विषय शिक्षक महासंघाच्या वतीने राखी चे या यशाबद्दल अभिनंदन करण्यात आले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!