spot_img
spot_img
26.9 C
New York
Wednesday, July 29, 2026

प्राचार्य सचिन सरपटवार यांना भावपूर्ण निरोप

भद्रावती : येथील लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन सरपटवार यांना सेवानिवृत्तीनिमित्य कनिष्ठ महाविद्यालयातर्फे एका समारंभात नुकताच भावपूर्ण निरोप देण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार होते.तर प्रमुख अतिथी म्हणून लोकसेवा मंडळाचे सचिव नामदेवराव कोल्हे, सहसचिव अमित गुंडावार, सदस्य गोपाळराव ठेंगणे, अविनाश पाम्पट्टीवार, संजय पारधे, श्रीमती शैलजा सरपटवार, प्राचार्य सचिन सरपटवार, सुप्रिया सरपटवार, उपप्राचार्य रुपचंद धारणे, पर्यवेक्षक प्रफुल्ल वटे प्रभृती मंचावर उपस्थित होते. यावेळी प्राचार्य सचिन सरपटवार यांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर प्राचार्य सरपटवार यांचा लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ व वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्राचार्य सरपटवार यांच्या सौभाग्यवती सुप्रिया सरपटवार यांचाही यावेळी साडी चोळी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयातर्फे उपप्राचार्य रुपचंद धारणे, लोकसेवा कर्मचारी सहकारी पत संस्थेतर्फे अध्यक्ष शरद राजुरकर, लोकमान्य ज्ञानपीठातर्फे श्वेता उपरे आणि शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांतर्फे लता देवगडे यांच्याकडून प्राचार्य सरपटवार यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

यावेळी अनेक वक्त्यांनी आपल्या मनोगतातून प्राचार्य सरपटवार यांनी एक प्राध्यापक म्हणून आणि प्राचार्य म्हणून केलेल्या कार्याचा गौरवोल्लेख करुन भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सत्कारमूर्ती प्राचार्य सरपटवार यांनी सत्काराला उत्तर देताना संस्थेचे आणि सर्व सहकाऱ्यांचे त्यांच्या सेवाकाळात केलेल्या सहकार्याबाबत आभार मानले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रफुल्ल वटे यांनी केले. संचालन व आभारप्रदर्शन शिक्षक समिर उपलंचीवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!