चिमूर :
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा आयोजित पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दि. ०९ फेब्रुवारी २०२५ ला परिषदे द्वारा महाराष्ट्रात विविध परिक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. या परीक्षेत जिवीका इंग्लिश मिडीयम स्कूल ने ऐतिहासिक कामगिरी करत इयत्ता ५ वी आणि ८ वी मिळून एकूण ४ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. त्यांनी आपल्या शाळेचे तसेच पालकाचे नाव उज्वल केले.
यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये कु. ईशिका किसन भोले, तृषा सुरेश ढोके, साची हरिष घंदरे व रिया दिवाकर पडोळे यांचा समावेश आहे. त्यांच्या या यशामध्ये शाळेतील मार्गदर्शक शिक्षक श्री हर्षित उपाध्याय सर शुभांगी आष्टनकर, दिपाली कुंभले, आचल शिवरकर, दिपाली बानकर तसेच पालकांचे पाठबळ आणि विद्यार्थ्यांची स्वतःची कठोर मेहनत कारणीभूत आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्याचे विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री हर्षित उपाध्याय सर व शाळेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आंबेनेरी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री ताराचंद रामटेके सर, शाळेचे मुख्याध्यापक, श्री. हर्षित उपाध्याय सर, सौ. शुभांगी आष्टनकर,
पालकांमध्ये उपस्थित काटोले सर, सयाजीराव वाघमारे, विजयजी वऱ्हाडे, पंकज गाडीवार, पंकज निमजे, विजय डहाके सर, जगदीश डुकरे,
दुर्वास नंदनवार, हर्षल ठोंबरे, सौ. सुहासिनी किसन भोले, सौ. लता संजय पडोळे, सौ. सुषमा हरिष गंधरे, सौ प्रियंका सुरेश ढोके तर शिक्षिका कु. दिपाली कुंभले, कू. आचल शिवरकर, कुं. दिपाली बानकर, यांचे सुद्धा बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व पालकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.






