spot_img
spot_img
18.2 C
New York
Monday, June 8, 2026

अवैध रेती वाहतूक करणाऱ्या रेती तस्करावर आशीर्वाद कुणाचा?

वरोरा तालुक्यातील महसूल अधिकारी रेती तस्कराच्या खिशात आहे का?

पत्रकारांनी फोनद्वारे महसूल अधिकारी यांना माहिती विचारना करीता प्रयत्न केला असता करतात फोन कट..

रेती तस्कर देत आहे खुलेआम पत्रकारांना धमकी..

वरोरा तालुक्यात सध्या जोमामध्ये रेती तस्करी सुरु आहे. या मध्ये एकीकडे भद्रावती महसूल विभाग कारवाई करत असताना वरोरा महसूल विभाग मात्र संशयच्या भोवऱ्यात सापळत आहे. सध्या तालुक्यातील शेगाव, अर्जुनी, आष्टा, पारोधी, किन्हाळा, कोकेवाडा, धानोली घाटावरून अवैध रेती भरून येत असून कारवाई मात्र होत नाही. त्यामुळे रेती तसकारांची हिम्मत गगनाला भिडलेली आहे. रेति तस्कर हे दिवसरात्र रेती उपसा करीत असून महसूल विभागाच्या संगणमताने हा सगळा कारभार सुरु असल्याचे नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे. यातच आता लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ देखील सुरक्षित राहिला नसल्याचे दिसत आहे. रेती घाटावर जर माहिती घेण्यासाठी बातमी संकलणासाठी पत्रकार गेले असता हे रेती तस्कर गुंडे असल्यासारखे पत्रकरांच्या गाड्यांच्या चाब्या काढण्यापासून तसेच मारायला अंगावर चालून येण्यापर्यंत यांची मजल वाढलेली आहे, व तुमच्यानी जे होते ते करा आमचं कोणीही वाकड करू शकत नाही अशा धमक्या रेती तस्कर खुलेआम देत आहे. त्यामुळे आता महसूल विभागाच्या काही कर्मचाऱ्यांच्या कार्यावर व सोबतच असलेल्या संगलमतावर आता प्रशचिन्ह निर्माण होत आहे. जर हे तहसीलचे काही महसूल अधिकारीच रेती तस्करासोबत हात मिळवणी करून असेल तर यांना आळा घालणार तरी कोन? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. याकडे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आता लक्ष पुरवून वरोरा तहसील तसेच शेगाव पोलीस स्टेशन हद्दीत होणारे अवैध धंद्यावर चाप लावतील का? याकडे मात्र जनतेची लक्ष लागले आहे….

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!