घुग्घुस : शहरालगत नकोडा येथील अदानी समूहाच्या एसीबी सिमेंट कारखान्याच्या चौकशी आदेश राष्ट्रीय हरित न्यायधिकरणाच्या पुणे खंडपीठाने दिल्याने कंपनी व्यवस्थापनात खळबळ उडाली आहे. या सिंमेट कंपनीकडून होत असलेल्या पर्यावरण नियमांच्या उल्लंघनाबाबत तक्रारींची चौकशी करण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाची संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार आहेया समितीला घटनास्थळीची पाहणी वस्तुस्थिती संकलित करणे आणि पर्यावरण नियम व कायदाचे उल्लंघन झाल्यास दोन माहिण्यांच्या आत समस्या सोडविण्यासाठी कियदेशीर कारवाई व उपाययोजना करण्याचे आदेश राष्ट्रीय लवादाच्या पुणे खंडपीठाने दिले आहेत.

एसीसी सिमेंट कंपनी विरोधात सुरेश पाईकराव यांनी ७जून २०२२रोजी तक्रार दाखल केली होती.त्याची तक्रार एनजीटी कायदा २०१० च्या कलम १४ आणि १५ अतंर्गत याचिका म्हणून स्विकारण्यात आली सिमेंट कंपनीकडून नागपूर, मुंबई ,पुणे, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, आणि बंगळुरू येथुन टाकाऊ कपडे कालबाह्य औषधे आणत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहेजाळण्यात आलेले मृतदेह प्लास्टिक शेतीच्या कच-यामळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत आहे.कंपनीच्या कृती मध्ये वर्धा नदी जलपदुषन झाल्याचा आरोप करण्यात आला होता. रहीविशी भागात ट्रक उभे राहत असल्याने ध्वनी व वायू प्रदूषण होत असल्याने तक्रार होती एनजीटी ने या मुद्यावर स्थानिक अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची गरज असल्याचे म्हटले आहेयासाठी जिल्हा दंडाधिकारी चंद्रपूर हे नोडल एजन्सी असतील त्यांना समन्वय साधून करण्यास सांगितले आहे.समीतीने केलेल्या कारवाई अहवाल एनजीटी कडे पाठविला जाणार असुन यासंदर्भात एसीसी जनसंपर्क अधिकारी पुष्कर चौधरी यांना विचारणा केली असता त्यांनी कोणतेही प्रतिक्रिया दिलेली नाही






