भद्रावती येथे श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबीर संपन्न
भारतीय संस्कृतीतील महानतम जीवन मुल्ये आजच्या पिढीमध्ये रुजवून बाल तरुणांची मने सुसंस्कार युक्त घडावीत व धर्म, समाज तसेच राष्ट्र कार्यात त्यांचे योगदानाचे महत्त्व लक्षात घेता भद्रावती येथे श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिर समिती भद्रावतीचे वतीने भक्त निवास गणेश मंदिर, सुर्यमुखी हनुमान मंदीर, गवराळा येथे श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिर नुकतेच पार पडले.
१६० पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुसंस्काराचे धडे देऊन वंदनीय राष्ट्रसंताचा विचार प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
१० दिवस चाललेल्या अनिवासी शिबिराची सुरुवात दररोज पहाटे ५.३० वाजता सामुदायिक ध्यानाने होऊन त्यानंतर सूर्यदर्शन , योगासने, मल्लखांब, कराटे, लाठी-काठी, बौद्धिक तासीका, संगीत वर्ग, गटचर्चा भजन-श्लोक, श्रीमद्भगवद्गीता संथा, टाळ-पदन्यास, ओळख सुंदर जीवनाची व सामुदायिक प्रार्थनेने शेवट होऊन पुढील दिनचर्येकरीता विद्यार्थ्यांना स्वगृही पाठविल्या जात असे. वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी सांगितलेले ग्रामगीतोक्त जीवन शिक्षणाचे धडे देणा-या या शिबीरात सामुदायिक ध्यान व प्रार्थनाप्रसंगी संपूर्ण विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांची उपस्थिती तसेच अनेक प्रतिष्ठित नागरिक व मान्यवरांची भेट या शिबिराचं विशेष आकर्षण ठरले.
१० दिवस चाललेल्या समारोपीय कार्यक्रमाची सुरुवात गुरुदेव हमारा प्यारा या संकल्प गिताने होऊन श्रीगुरुदेव राष्ट्रधर्म प्रचार समिती दासटेकडीचे मोझरी येथील शिक्षकांनी शिबिरात दिलेल्या प्रशिक्षणाचे विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक कार्यक्रम प्रसंगी सादर केले.
श्रीगुरुदेव राष्ट्रधर्म प्रचार समिती दासटेकडीचे मोझरीचे संचालक तसेच मार्गदर्शक आचार्य श्री हरिभाऊ वेरूळकर गुरुजी यांचे मार्गदर्शनात संपन्न झालेल्या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शालीकजी दानव सर होते , तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून रामदासपंत चोरोडे गुरुजी यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून हभप केशवानंद मेश्राम महाराज, चंद्रकांत गुंडावार, प्रशांत कारेकार, प्रफुल चटकी, गजानन इंगळे जिल्हा वाशिम उपस्थित होते.
समारोपीय कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिबीर प्रमुख गुणवंत कुत्तरमारे तसेच हभप मनोज महाराज चौबे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेक महाकाळकर यांनी तर आभार प्रदर्शन विशाल गावंडे यांनी केले.
श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिर समिती, भद्रावती तर्फे चालवलेल्या स्थायी निधी उपक्रमात मदत करणारे सहयोगदाते उल्हासजी भास्करवार तसेच केशवानंद मेश्राम यांचा मान्यवरांच्या हस्ते याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता मधुकर बांदुरकर, बालाजी नागपुरे, गजानन डंभारे, मुरलीधर मेश्राम, गजानन ढेंगळे, तुकाराम उमाटे, गोपीचंद मेश्राम, विनोद रासेेकर, नरेश दिवसे, झनक चौधरी, नरेंद्र मेश्राम, रमेश धाबेकर, बाबाराव तेलरांधे, कालिदास चेडे, अनिल पिट्टलवार, क्षितीज शिवरकर, रविश मुरकुटे, प्रकाश पिंपळकर, शोभाताई खडसे, जिजाबाई देठे श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिर समिती तसेच श्री गुरुदेव सेवा मंडळ भद्रावतीच्या कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.






