आमदार अभिजीत वंजारी यांचा पुढाकार व मार्गदर्शन…
भद्रावती
गोविंदराव वंजारी फाउंडेशन नागपूर तर्फे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन आज दिनांक 29 /3/ 2025 रोजी शनिवारला स्वागत सेलिब्रेशन सभागृह भद्रावती येथे आयोजित करण्यात आला. या रोजगार मेळाव्याला हजारो शिक्षित बेरोजगार युवक उपस्थित होते.
गोविंदराव वंजारी फाउंडेशन नागपूर तर्फे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन भद्रावती येथे एडवोकेट अभिजीत वंजारी पदवीधर आमदार यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले. या रोजगार मेळाव्यला हजारोच्या संखेने पदवीधर बेरोजगार उपस्थित होते. या रोजगार मेळाव्यात विविध कंपन्या चे प्रतिनिधी उपस्थित होते. साधारणतः 36 कंपन्या या रोजगार मेळाव्यासाठी उपस्थित झाल्यात. त्यांनी आपापल्या कंपनीत आवश्यक असलेल्या रिक्त जागा भरण्यासाठी या ठिकाणी शिक्षित बेरोजगारांच्या मुलाखती घेतल्या. या रोजगार मेळाव्याला परिसरातील असंख्य उच्चशिक्षित युवक, युवती रोजगाराची संधी प्राप्त करण्यासाठी हजार होते.
या रोजगार मेळाव्याला ऍडव्होकेट अभिजीत वंजारी आमदार विधान परिषद महाराष्ट्र राज्य यांनी युवकांना मार्गदर्शन केले. गुणवत्ते सोबतच आपली इंटरव्यू देऊन आपण नोकरीची संधी प्राप्त कराल असा आशावादही व्यक्त केला. विधानसभेत ग्रंथालयाचा आवाज बुलंद करण्याचे काम व ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे कार्य एडवोकेट आमदार अभिजीत वंजारी करतात. त्याबद्दल त्यांचे भद्रावती ग्रंथालय संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. अशा प्रकारचा भव्य रोजगार मेळावा आयोजित केला व आम्हाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल अनेक बेरोजगार बांधवांनी समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमाला रोटरी क्लब भद्रावती चे अध्यक्ष किशोर खंडाळकर, कोषाध्यक्ष हनुमान घोटेकर, डॉ. ज्ञानेश हटवार तसेच प्रज्ञाविकास वाचनालय भद्रावती चे पदाधिकारी, काँग्रेसचे पदाधिकारी व नोकरीच्या शोधात असलेले शिक्षित बेरोजगार युवक मोठ्या संख्येत उपस्थित होते.






