जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे आयोजन…
प्राचार्य राजकुमार हिवारे यांनी साधला प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद…
चंद्रपूर
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर द्वारा चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षण पर्यवेक्षण यंत्रणेला शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण २.० चे आयोजन दि. २५,२६ मार्च ला करण्यात आले. हे प्रशिक्षण चंद्रपूर जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व साधन व्यक्ती यांच्यासाठी हे प्रशिक्षण देण्यात आले.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर चे प्रचार्य राजकुमार हिवारे सर यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षण विभागातील पर्यवेक्षण यंत्रणेला शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण डायट चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले. यात चंद्रपूर डाएटचे प्राचार्य राजकुमार हिवारे सर यांनी प्रशिक्षणार्थ्यांची संवाद साधून नियोजनावर मार्गदर्शन केले. शिक्षण धोरणाची अंमलबजावणी योग्य रीतीने होत आहे की नाही, याचे निरीक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे. आपण ती जबाबदारी चौखपणे पार पाडावी असेही विचार त्यांनी व्यक्त केले. तसेच प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी प्राथमिक शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे मॅडम चंद्रपूर यांनी प्रशिक्षणाला भेट दिली व पर्यवेक्षण यंत्रणेतील प्रशिक्षणार्थी यांच्याशी संवाद साधला व प्रशिक्षणा बद्दल चर्चा केली.

या प्रशिक्षणाला प्रा. डॉ ज्ञानेश हटवार भद्रावती, श्री. माधव हाके कोकेवाडा, श्री. विकास मोहिते भद्रावती व सौ. दीक्षा कांबळे गोंडपिपरी, अली अजानी सर राजुरा हे तज्ज्ञ मार्गदर्शक होते. पहिल्या दिवशी चे अहवाल वाचन संगिता सराफ मॅडम यांनी केले. या प्रशिक्षणाचे समन्वयक म्हणून विवेक ईत्तडवार सर, धनराज एलमुलवार सर, सपना पिंपळकर मॅडम आणि अमोल बल्लावार सर यांनी काम सांभाळले. या प्रशाक्षणाला २०० च्या वर प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.






