नागपूर : औरंगजेबची कब्र हटवण्यासाठी जे आंदोलन झालं त्या अनुषंगाने सोशल मीडिया हॅण्डल वरून काही भडकाऊ व्हीडिओ व्हायरल करण्यात आले होते. त्यात पोलिसांविरोधात हल्ल्याचा कट रचणे आणि सर तनसे जुदा यासारखे भडकावू वक्तव्य सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते. सोमवारी रात्री नागपुरात झालेल्या हिंसाचाराचे आपत्तीजनक व्हिडीओ सोशलमीडियावर पोस्ट करणाऱ्या ५० लोकांविरोधात नागपुर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. अशी माहिती सायबर सेल चे पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी आज नागपुरात आयोजीत पत्रकार परिषदेत दिली.

दंगल घडवण्यास प्रवृत्त करणारे १७२ व्हिडीओ सायबर पोलीसांच्या हाती लागलेले आहेत. त्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. याव्यतिरिक्त २३० असे अकाउंट पोलिसांनी व्हेरीफाय केले आहे, ज्यावरून दंगलीचे अनेक आक्षेपार्ह व्हिडीओ वायरल करण्यात आले आहे त्यांना देखील लवकरचं ताब्यात घेतले जाणार असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. असेही मतानी यांनी सांगितले. जे आरोपी आहे त्यात मुख्य आरोपी फहिम खान आहे. त्यात देशद्रोह चा गुन्हा दाखल केला आहे. त्याला सायबर पोलीस प्रॉडक्शन वॉरंट वर ताब्यात घेणार आहे असेही सायबर सेल चे पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी सांगितले.
फहिम खान मुख्य आरोपी असुन त्याने व्हीडिओ सोशल मीडिया वर व्हायरल केले त्यांनतर हिंसा उसळली. असेही मतानी यांनी सांगितले. नागपुरात उसळलेल्या दंगलीमागे बांगलादेशचे कनेक्शन संदर्भात विचारले असता सध्यातरी याची माहिती पोलिसांकडे नसून काही सोशल मीडिया हॅण्डल च्या IP ऍड्रेस ची तपासणी केली जात आहे. नागपुर दंगली मागे काही देशाबाहेरील लोकांचा हात होता का या संदर्भात तपास केला जात असुन येत्या 2 दिवसात आमच्याकडे सर्व माहिती येणार असल्याचेही त्यांनी सांगितले सांगितले.






