spot_img
spot_img
18.3 C
New York
Monday, June 8, 2026

सामूहिक अत्याचार, हत्या करून मृतदेह टाकला विहिरीत

अल्पवयीन मुलीचे आत्महत्या प्रकरण पत्रकार परिषदेत आई-वडिलांचा आरोप

भद्रावती : तालुक्यातील चोरा या गावातील एका अल्पवयी मुलीचा संशयास्पद मृतदेह विहीरीत आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. वैद्यकीय अहवालात अत्याचारानंतर आत्महत्या केल्याचा उल्लेख आहे. मात्र आपल्या मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. नंतर तिचा मृतदेह विहिरीत टाकण्यात आला असा आरोप मृतकाच्या आई-वडिलांनी चोरा येथील पत्रकार परिषदेत केला.

या प्रकरणाचा तपास गुप्तचर यंत्रणेमार्फत करण्यात यावा तसेच या घटनेची माहिती महिला आयोगाला देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. माझ्या मुलीला न्याय न मिळाल्यास लोकशाही मार्गातून आंदोलन उभारू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. माझी१४ वर्षीय अल्पवयीन मुलगी दि. २० मार्चला सकाळी ११ वाजता घरून निघून गेली. ती परत आली नसल्याने आम्ही, नातलग, आणि गावातील नागरिकांनी चोरा परिसरात शोध घेतला. ती दिसून आली नाही. मृतदेह आढळलेला विहिरीजवळ सुरुवातीला गावातील ७ व बाहेरील २ मुले याच परिसरात संशयास्पद रित्या फिरत होते. त्यांना विचारणा केली असता उडवा उडवीची उत्तरे दिली . याच गावातील अमोल रामकृष्ण दोडके या २२ वर्षीय युवकाचे घरी ती सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत होती अशी माहिती मिळाली. त्यानंतर ती शेत शिवारातील ज्ञानेश्वर आसुटकर यांच्या विहिरीकडे कशी गेली.याचा तपास अजून पर्यंत पोलिसांनी लावला नाही. विहिरीजवळ माझ्या मुलीचा मोबाईल व चप्पल दिसून आली. विहिरीत दोराने गळ टाकून बघितले असता मुलीचा मुतदेह पाण्यात होता. पोलिसांच्या कारवाईनंतर चंद्रपूर येथे मृत मुलीचे शवविच्छेदन झाले. त्यामध्ये मुलीवर अत्याचार झाल्याचे सांगण्यात आले. परंतु तिची हत्या नसून आत्महत्या आहे असे वैद्यकीय अहवालात सांगितले. या प्रकरणात अमोल दोडके याला अटक करण्यात आली. आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेत अमोल सह अन्य ९ आरोपीचा सहभाग आहे. माझी १४ वर्षाची अल्पवयीन मुलगी आत्महत्या करू शकत नाही. तिची हत्या करून नंतर मृतदेह विहिरीत टाकण्यात आला. या घटनेत मुख्य आरोपीसह त्याच्या इतर सहकाऱ्यांचा सुद्धा सहभाग आहे. त्यांचेवर सुद्धावर कारवाई करू आमच्या मुलीला न्याय द्यावा अशी विनंती मृतकाच्या आई-वडिलांनी पत्रकार परिषदेत केली. आम्हाला न्याय न मिळाल्यास कायदेशीर रित्या आंदोलन करू असा इशारा आई-वडिलांसह चोरा ग्रामस्थ आणि नातलगांनी यावेळी दिला. पत्रपरिषदेला मृतकाची आई दीपा आसुटकर, वडील रंदिप आसुटकर, सुनील तेलंग, गोपाल साव, महानंदा साव , विजय कातकर ,भीमराव रंगारी , माधुरी गेडकर , सचिन रंगारी , रंजना आसुटकर सह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते .

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!