spot_img
spot_img
26.9 C
New York
Wednesday, July 29, 2026

अवैध रेती वाहतुक करणारा ट्रॅक्टर वनविभागाने केला जप्त

पिर्ली नियतक्षेत्रातील कारवाई

भद्रावती : वनपरिक्षेत्रामध्ये अवैधरित्या रेती उत्खनन करून वाहतुक करीत असलेल्या गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाने टाकलेल्या धाडीत रेती भरलेला ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. ही कारवाई दि.११ मार्च ला सकाळी ०७.३० वाजताच्या सुमारास केली.

विभागीय वनअधिकारी, चंद्रपुर, प्रशांत खाडे, सहाय्यक वनसंरक्षक विकास तरसे, चंद्रपुर यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रावती वनपरिक्षेत्र अधिकारी, के. डब्ल्यु. धानकुटे यांचे सह क्षेत्रीय वन कर्मचारी यांनी गस्तीला गेले असता त्यांनी रुपेश संभाजी जांभुळे रा. पावणा या ट्रॅक्टर चालकाचे महिंद्रा B275 DI ट्रॅक्टर क्रमांक- MH34-AP-2290 व ट्रॅक्टर ट्रॉली नंबर नसलेली (लाल रंग) नाल्यातुन अवैधरित्या रेती उत्खनन करुन वाहतुक करीत असल्याचे दिसुन आले. वाहन चालकाला रेती वाहतुकीचा परवाना मागितला त्याचेकडे आढळुन आला नाही. तेव्हा वनअधिकारी यांनी ट्रॅक्टर मालक व चालक रुपेश संभाजी जांभुळे याचेवर कारवाई करीत ट्रॅक्टर जप्त करण्यात आले.

या कारवाईत ए.बी. शेळकी, क्षेत्रसहाय्यक, मासळ, एम. आर. देठे, वनरक्षक पिलर्टी आणि वनमजूर अमरदीप बाबुलाल कोल्हे, रा. पिर्ली व नामदेव मोतीराम जिवतोडे, रा. खुटाळा यांनी ही मोहीम यशस्वी राबविली.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!