भद्रावती : तहसील कार्यालय भद्रावती येथे दि.११ मार्च रोजी राजेश भांडारकर, तहसीलदार भद्रावती यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस पाटील यांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी सुधीर खांडरे, नायब तहसीलदार उपस्थित होते.

ज्या गावातील पांदण रस्त्यांबाबत समस्या उपस्थित झालेले आहे त्या गावातील पांदण रस्त्यांचा प्रश्न तात्काळी निकाली लावण्यात येईल यावर भर देण्यात आली. तसेच प्रत्येक शेतकऱ्यांचे फार्मर आयडी काढण्यात यावी त्यासाठी पोलीस पाटलांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांना भेटून व त्याबाबत जनजागृती करून प्रत्येकाना माहिती देऊन त्यांचे फार्मर आयडी काढण्यात यावी यावर विशेषतः भर देण्यात आले. तसेच स्मशानभुमी बाबत व ज्या गावात पूर परिस्थिती उद्भवून वाहतूक व रस्ते बंद होतात अशा गावांची माहिती घेऊन त्यावर पूर्व उपाययोजना करून त्याचे निवारण करण्यात येईल असे तहसीलदार हमी देऊन प्रत्येक गावातील पोलीस पाटलांच्या समस्या जाणून घेतल्या. पोलीस पाटील हा प्रशासनाचा कान, नाक, डोळा असल्यामुळे कुठल्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थितीची माहिती पोलीस पाटील तात्काळ प्रशासनाला पोहोचविते असे तहसीलदारांनी संबोधले.






