भद्रावती
जागतीक महिला दिनाचे औचित्य साधून डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय महाविद्यालयात महिला दिन उत्सव कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमाची सुरूवात महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली.
महिलांनी राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फूले यांचा आदर्श व संवैधानिक अधिकाराची जोड देऊन जीवनाची वाटचाल केली तर महिलांचा सर्वांगीण विकास कोणीही रोखू शकणार नाही. महिला विद्यार्थिनींना गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन आधुनिक व पारंपरिक भारतीय मूल्यांची सांगड घालून यशस्वी जीवन जगता येते असे प्रतिपादन प्रा. उज्वला वानखेडे यांनी केले. डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय महाविद्यालयात महिला दिनाच्या कार्यक्रमात त्या अध्यक्षीय भाषणात बोलत होत्या.
प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य कनिका सिकदर यांनी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या मुलींनी चिकाटीने आपले उच्च शिक्षणाची कास पकडुन ते यशस्वीपणे पूर्ण करावे. स्वतःला तसेच कुटुंबाला पर्यायाने राष्ट्राच्या विकासामध्ये योगदान द्यावे असे मत व्यक्त केले.
महिला हि सबला नसून ती शक्तिशाली आहे. त्यांनी आपल्यातील सुप्त शक्ती ओळखण्याची गरज आहे असा आशावाद प्रा. प्रिती कांदीकट्टीवार पप्रास्तविकेतून यांनी व्यक्त केला. या प्रसंगी महाविद्यालयातील महिला प्राध्यापकांचा व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. राष्ट्रिय सेवा योजना सहा. कार्यक्रम अधिकारी प्रा. नेहा मानकर यांनी सूत्रसंचालन केले.
पितृसत्ताक पद्धती कालबाह्य झाली असली तरी आधुनिक विचारांची व वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून काळाच्या सावध हाका ऐकून महिलांनी सजग राहावे असा सावध इशारा देऊन सांस्कृतिक विभाग समन्वयक प्रा. प्रज्ञा लांडे यांनी कार्यक्रमांचे आभार मानले. संस्थेचे सचिव डॉ. कार्तिक शिंदे यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम यशस्वी झाला. यावेळी डॉ. प्रशांत पाठक, प्राचार्य प्रमोद पाठक, प्रा. कपिल राऊत, प्रा. विशाल प्रसाद, सीमा हवेलीकर, पुनम काळे, किरण नागपुरे तसेच असंख्य विद्यार्थी उपस्थित होते






