भद्रावती : वाल्मीक कराडने केलेल्या संतोष देशमुख निर्घृण हत्येच्या निषेधार्थ भद्रावतीत बाळासाहेब ठाकरे प्रवेश द्वार येथे शिवसेना (शिंदे गट) च्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी वाल्मीक कराड आणि आरोपींच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करत त्याचे दहन केले. तसेच या घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली.

या आंदोलनात शिवसेना (शिंदे गट) चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी उपस्थित शिवसेना (शिंदे गट) चे तालुका प्रमुख कडसकर, उपतालुका प्रमुख सिंगलदीप पेंदाम, उपतालुका प्रमुख सुंदर सिंह, शिवसैनिक सुमित हस्तक, उपशहर प्रमुख मनीष बुच्चे, प्रथम गेडाम, अक्षय आस्कर, सूरज ढवळे, राहुल आस्कर, रितेश बुच्चे, साहिल कसारे , सुंदर, ओम पारखी, स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि या घटनेचा कठोर शब्दांत निषेध व्यक्त केला.






