spot_img
spot_img
26.9 C
New York
Wednesday, July 29, 2026

अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाची कारवाई….

अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर महसूल विभागाच्या गौण खनिज पथकाने कारवाई करीत ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई केली आहे ही कारवाई मंगळवार ला रात्रो नऊ च्या दरम्यान तालुक्यातील मानोरा गावाजवळ घडली, सदर ट्रॅक्टर आष्टा घाटावरून अवैध रेती भरून येत असल्याची गोपनीय माहिती गौण खनिज पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी मानोरा गावाजवळ सदर ट्रॅक्टरवर कारवाई केली सदर ट्रॅक्टर शेगाव बु, येथील असल्याचे सांगण्यात आले सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालयात लावण्यात आले असून पुढील कारवाई महसूल विभाग करीत आहे सदर कारवाई भद्रावती येथील तहसीलदार राजेश भांडारकर यांचे नेतृत्वात नायब तहसीलदार मनोज अकनुरवार, मंडळ अधिकारी समीर वाटेकर, शिपाई निर्दोष फुलभोगे यांनी केली.

सध्या आष्टा नदी वरून मोठ्या प्रमाणात दिवसरात्र अवैध रेतीची तस्करी सुरु असून कारवाई कमी असल्या कारणांनी रेती तस्कराचे मोठ्या प्रमाणत फावत आहे. काही रेती तस्करांना तर प्रशासनाची सुद्धा भीती उरलेली नसून पत्रकारांना सुद्धा धमकावण्याचा प्रकार शेगाव परिसरातील रेती तस्कर करीत आहे. त्यामुळे यांच्यावर महसूल विभाग, पोलीस प्रशासन, यांनी मोठ्या प्रमाणात कारवाईचा बडगा उभारण्याची गरज असल्याचे चित्र निर्माण झाले आहे…

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!