spot_img
spot_img
22.3 C
New York
Monday, June 8, 2026

बीट मुधोली येथील जिल्हा परिषद शाळा कोंडेगाव येथे सीखे प्रदर्शनीचा शुभारंभ

भद्रावती : तालुक्यात बीट मुधोली येथील जिल्हा परिषद शाळा कोंडेगाव शाळेतून सिखे इंडिया उत्सवाची दमदार सुरुवात करण्यात आली. यात ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन आणि सहयोग देऊन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य केले.

ग्रामस्थांच्या एकजूट आणि समन्वयाचे जिवंत उदाहरण आजच्या विद्यार्थी प्रदर्शनात दिसून आले. मागील 4 वर्षांपासून भद्रावती तालुक्यात ( TIP ) टीचर इनोव्हेटर कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गत भाषा आणि गणित विषय शिक्षविण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचे प्रशिक्षण शिक्षकांना दिले जाते आणि त्या पद्धती शिक्षक विद्यार्थ्यांसीबत वर्षभर घेत असतात. वर्षाच्या शेवटी विद्यार्थी काय काय शिकले हे पाहण्यासाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी भाषा आणि गणित विषयांचे वेगवेगळे मॉडेल्स तयार करून उपस्थित गावकऱ्यांना विश्लेषण करून सांगितले. या प्रदर्शनाची सुरुवात प्रभातफेरीने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपापल्या मॉडेल्सचे सादरीकरण केले. अपूर्णांकामध्ये विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी माझे घर, करीनाची खेळण्याची कपाट, माझ्या शाळेचे मैदान अशा विविध अपूर्णांकावर आधारित मॉडेल तयार केले तसेच इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी घटनेचा क्रम लावून गोष्टी सांगितल्या. तसेच कबूतर आणि मुंगी चित्र कार्ड वरून विद्यार्थ्यांनी गोष्ट सांगितली चिमुकल्यांच्या गोष्टी ऐकून पालक वर्ग अगदी उत्साहीत झाले.

कार्यक्रमाचे उदघाटन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ नीताताई गेडाम यांनी केले तसेच प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमाला वसंतरावजी दडमल, जांभुळे साहेब व शाळेचे मुख्याध्यापक अतुल रंधे उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रास्ताविक कोच कल्याणी भोस्कर यांनी केले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी अनुष चौके आणि संघर्ष भोयर इयत्ता चौथी तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षक सुशांत मुनगंटीवार यांनी केले .

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!