spot_img
spot_img
23.4 C
New York
Monday, June 8, 2026

विवेकानंद महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

भद्रावती/प्रतिनिधी

स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. जी. उमाटे होते.प्रमुख मार्गदर्शक म्हणून विदर्भ कोंकण ग्रामीण बँक, शाखा वरोरा येथील शाखा व्यवस्थापक प्रफुल्ल आत्राम, मराठी विभागातील डॉ. यशवंत घुमे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आत्राम म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य व विचार अंगीकृत करून तसे आदर्श ठेवून आपले जीवन जगले पाहिजे. त्यांचे आर्थिक क्षेत्रातील उदाहरणे, नियोजनातील उदाहरणे, व्यवस्थापनातील उदाहरणे आपण लक्षात घेऊन तसे आपल्या जीवनाचे नियोजन करीत गेलो तर आपणही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही असे मत व्यक केले. यावेळी डॉ. यशवंत घुमे यांनी शिवाजी महाराजांची कृषीविषयक भूमिका मांडली. अध्यक्षीय विचार व्यक्त करताना प्राचार्य डॉ. उमाटे यांनी सांगितले की, आपण शिवचरित्राचा अभ्यास करून ते आत्मसात करावे.

याप्रसंगी कु. जिनत पठाण , रोहित टेकाम या विद्यार्थ्यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो अधिकारी डॉ. जयवंत काकडे, संचालन पूजा कोहरे, डॉ गजानन खामनकर यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ प्रकाश तितरे, डॉ रमेश पारेलवार यांच्यासह संजय तामगाडगे, रोहित टेकाम, वैष्णवी बावणे, साहिल रंगारी, वैष्णवी पिंपळकर, अवंतिका कोलते, हर्षदा कोळापे, इत्यादी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!